Tuesday, April 23, 2024

Latest Posts

रणवीर-दीपिकाच्या घरी येणारं नवा पाहुणा? व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमीच तिच्या फॅशन आणि लूकसाठी चर्चेत येत असते.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमीच तिच्या फॅशन आणि लूकसाठी चर्चेत येत असते.मात्र सध्या दीपिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.. दीपिकाने नुकतचं बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिच्या साडीची चांगलीच चर्चा रंगली. तर दुसरीकडे साडीमध्ये ती बेबी बंप लपवताना दिसून आली.दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण अद्याप दीपिका-रणवीरने याबाबतची कोणतीच माहिती चाहत्यांना दिलेली नाही. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दीपिका पादुकोणचा ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने ऑफ-व्हाईट रंगाची खूपच सुंदर साडी नेसली होती. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली शिमरी साडी तिने नेसली होती. या साडीतील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती बेबी बंप लपवताना दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण लवकरच आई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. याआधी ‘फायटर’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी वोग सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणालेली,”आई होण्याची माझी इच्छा आहे. रणवीरलादेखील लहान मुले खूप आवडतात. कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्हाला प्रतीक्षा आहे”.

दीपिका पादुकोण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.दीपिकाच्या जवाण आणि पठाण सिनेमाने २०२३मध्ये दमदार कमाई केली.याचदरम्यान दीपिकासाठी २०२४ हे वर्ष देखील खास ठरतय असं म्हणायला देखील हरकत नाही.वर्षाच्या सुरुवातीलाच तिचा ‘फायटर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता दीपिकाच्या ‘सिंघम अगेन’ आणि ‘कल्कि 2989 AD’ या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा: 

मराठा समाजाचे आरक्षण १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss