Tuesday, April 16, 2024

Latest Posts

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हीच चर्चा सुरु आहे.गेले कित्येक महिने ते मराठा आरक्षणासाठी झगडताना दिसून येत आहेत.

सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हीच चर्चा सुरु आहे.गेले कित्येक महिने ते मराठा आरक्षणासाठी झगडताना दिसून येत आहेत.तर अशाच संघर्षयोध्द्यावर चित्रित केलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान नुकतचं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे.मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या  मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या सिनेमाचं चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ या सिनेमाची निर्मिती सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी सिनेमाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली  आहे . 

‘संघर्षयोद्धा’ या सिनेमात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे.  अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे, दरम्यान पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच प्रेक्षकांमध्ये  या चित्रपटाबाबतची उस्तपकत्ता शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा:

पुण्यात दीड दिवसांत ६०० किलो ड्रग्स जप्त, कुरकुंभमध्ये ड्रग्सचा अड्डा

मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले धन्यवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss