Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘फणस खाण्याचे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

सर्वजण फणस आवडीने खातात. उन्हाळाच्या दिवसात फणस सहज बाजारात उपलब्ध होतो. फणसाची भाजी पण बनवतात. फणस चवीला उत्तम असतो. फणस आरोग्यासाठी पण खूप उपयोगी असतो . फणस खाल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहेत का? फणसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असे जीवनसत्व असतात. फणस खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. फणसाचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी फणसाचे नियमित सेवन करावे. फणसामधले पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.

 

 

ज्यांना फणसाचे गरे खायला आवडत नाहीत, त्यांनी फणसाच्या भाजीच जेवणात समावेश करावा. फणसाची भाजी चवीला उत्कृष्ट असते. फणसामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. फणसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. या फायबरमुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.

 

हे ही वाचा:

झटपट “रवा वडा” बनवण्याची सोपी पद्धत

उन्हाळ्यात पुदिना-आल्याचे पाणी ठरेल गुणकारी, पण बनवायचे कसे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss