Wednesday, May 1, 2024

Latest Posts

झटपट “रवा वडा” बनवण्याची सोपी पद्धत

सर्वांना वडा हा पदार्थ खूप आवडतो. सांभार वडा, डाळ वडा, बटाटा वडा यांचा सर्वजण आवडीने नाश्तामध्ये समावेश करतात. पण तुम्ही कधी रवा वडा खाल्ला आहे का? रवा वडा चवीला खूप चविष्ट असतो. हा वडा बनवताना जास्त पदार्थ आणि वेळ लागत नाही. रवा वडा बनवताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. यासोबतच, लहान मुलांबरोबर मोठीमाणसं पण हा वडा आवडीने खातात. तुम्ही हे वडे मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात रवा वडा बनवण्याची सोपी पद्धत. 

 

साहित्य

१. बारीक रवा
२. बारीक चिरलेली हिरवी मिरची
३. बारीक चिरलेली कोथिंबीर
४. मीठ
५. जिरे
६. तेल

 

कृती –

सर्वप्रथम बारीक रवा घ्या. रवा नीट साफ करा. रवा नीट साफ केल्यावर गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्या पाण्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून पाणी चांगले उकळून घ्या. त्यानंतर त्या पाण्यामध्ये बारीक रवा टाकून एकत्र पीठ तयार करून घ्या. पीठ जास्त घट्ट करू नये. थोडं मध्यम पातळ पीठ तयार करा. एका ताटामध्ये पीठ काढून थोडं तेल लावून हलक्या हाताने मळून घ्या. पीठ चांगले मळून झाल्यावर मध्यम गोळे करून मध्यभागी बोटाच्या साहाय्याने छोटे छिद्र करा. गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. वडे तळण्यासाठी तेल चांगले गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर वडे तळायला घ्या. वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. वडे तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा. तयार आहे झटपट रवा वडा. तुम्ही हे वडे नारळाच्या चटणी किंवा सांबर सोबत पण खाऊ शकता.

 

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पुदिना-आल्याचे पाणी ठरेल गुणकारी, पण बनवायचे कसे?

‘सोयाबीन ची’ भुर्जी तुम्हाला येते का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss