Thursday, May 16, 2024

Latest Posts

अजून तब्येतीत सुधारणा होत आहे… Jui Gadkari ला नेमकं झालंय काय?

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिची स्टार प्रवाह वर ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) ही सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेतून तिने पदार्पण केले होते. ही मालिका पाच वर्ष चालू होती. आता ‘ठरल तर मग’ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसत आहे. जुई गडकरी महिन्यांपासून आजारी आहे. जुईने काही वर्षापूर्वी आजारपणामुळे इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

जुई गडकरी तिच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असते. त्याचवेळी चाहत्यांनी तिला तिच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारले. एका चाहत्यांनी ताई तू आजारी आहेस का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने आजारी असल्याचे मान्य केले. घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल असेही तिने सांगितले. एका चाहत्याने तुमची तब्येत कशी आहे? त्यावर तिने ‘अजून तब्येतीत सुधारणा होते आहे मध्येच मी म्युट मोडमध्ये जाते आहे, असे उत्तर दिले आहे. मागील काही भागांमध्ये जुईच्या आवाजात जरा वेगळेपण जाणवला होता. ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिला लाईव्ह सेशनमध्ये प्रश्न विचारले होते.

हे ही वाचा: 

‘त्वचेचा काळवटपणा’ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Ramadan Eid Special: ‘असा’ करा पारंपारिक शीरखुर्मा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss