Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Ramadan Eid Special: ‘असा’ करा पारंपारिक शीरखुर्मा

रमजान ईद म्हटलं की, सर्वात आधी लक्षात येते ती शीरखुर्माची वाटी. महिनाभर चालणाऱ्या रमजानच्या उत्साहात मुस्लिम बांधव उपवास करतात. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या उपवासाला पारसी भाषेत रोजा बोलतात. इस्लाम धर्मात रमजान सणाला भरपूर महत्व आहे. ईदच्या दिवशी सकाळच्या नमाजानंतर शीरखुर्मा बनवला जातो. सर्व कुटुंब एकत्र बसून शीरखुर्माचा आनंद घेतात. ईदच्या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांना शीरखुर्मा दिला जातो. शीरखुर्मा म्हणजे भरपूर ड्रायफ्रुटस, दूध आणि शेवया घालून तयार केला जाणारा पदार्थ. चला तर जाणून घेऊयात शीरखुर्माची रेसिपी.

साहित्य

१. शेवया
२. दूध
३. साखर
४. काजू, पिस्ता, मनुका, बदामाचे काप, खजूर, बेदाणे
५. तूप
६. वेलची पूड

कृती

सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाका. तूप टाकल्यानंतर त्यात बदाम, काजू, मनुका, पिस्ता, बेदाणे टाका. त्यानंतर खजूर टाकून मंद आचेवर भाजून बाजूला एका ताटामध्ये काढा. त्याच पातेल्यात चमचा भर तूप परत टाका. त्यात शेवया टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. दुसऱ्या बाजूला दूध गरम करत ठेवा. दूध चांगले उकळून त्यामध्ये केसर टाकून अधून-मधून ढवळत राहा. त्यानंतर साखर घालून ढवळून घ्या. आता त्यात भाजलेल्या शेवया घाला. दूध थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळवत ठेवा. शेवया नीट शिजवल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाका. त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रुटस टाकून चांगले मिसळून घ्या. तयार आहे पारंपरिक रमजान ईद स्पेशल शीरखुर्मा. फ्रिजमध्ये ठेवून थंडगार किंवा गरमागरम देखील शीरखुर्मा खाऊ शकता.

हे ही वाचा:

“यांच” बिनशर्त असतं आणि “त्यांच” मुख्यमंत्री पद मागतं, काय म्हणाले ASHISH SHELAR?

Raj Thackeray वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही, गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी Vijay Wadettiwar यांचे व्यक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss