Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘त्वचेचा काळवटपणा’ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. चेहऱ्याबरोबर शरीराची पण काळजी घेणं गरजेचं आहे. शरीरावरचा  काळपटपणा दूर करण्यासाठी बाजारात भरपूर प्रकारचे केमिकल ब्रॅंड उपलब्ध आहेत. एकदा जर काळपटपणा आला तर तो लवकर जात नाही. यासाठी काय उपाय करायचे हा प्रश्न पडतो ? चला तर जाणून घेऊयात काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय. 

. सगळ्यांकडे टोमॅटो सहज उपलब्ध असतो. टोमॅटोचा वापर काळपटपणा दूर करण्यासाठी करू शकतो. सर्वप्रथम एक टोमॅटो घ्या. त्या टोमॅटोची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट मानेवर किंवा कोपरावर लावा. आणि १० ते १५ मिनिटांनी धुऊन टाका.

. लाल मसूर डाळीला रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. त्यामध्ये कच्चं दुध  टाका. आणि ही पेस्ट लावून थोड्यावेळाने धुऊन टाका.

. लिंबूमध्ये साखर मिसळा. काळपटपणा आलेल्या जागी लावा. नंतर कोमट पाण्याने साफ करा.

. लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी ते काळपटपणा आलेल्या जागी लावून चांगल मालिश करा.

. तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ चांगले भिजून झाल्यावर बारीक करून घ्या. वाटलेल्या तांदळामध्ये कॉफी आणि व्हिटॅमिन-ई तेल घाला. हे मिश्रण काळपटपणा आलेल्या जागी लावा. आणि १० मिनिटाने हळूहळू स्क्रब करून काढून टाका.

 

हे ही वाचा:

‘फणस खाण्याचे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

Deepika च्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, काय म्हणाली?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss