बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी ‘डॉन-3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उस्तुकत्ता शिगेला पोहचली.रणवीर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.मात्र रणवीरसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार यावर शिक्का मोर्तब करण्यात आला नव्हता.अनेक अभिनेत्रींच्या नावाची वर्णी लावण्यात आली होती.मात्र आता रणवीरसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.
एक्सेल मुव्हीने कियारा आडवाणीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कियारा आडवाणीचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत… असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी ही दोघं पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्याने त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.बॉलीवूडमधली दोन्ही कलाकार सुपरस्टार आहेत.पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करत असलेली ही जोडी आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘डॉन 3′ मध्ये कियाराच्या एन्ट्रीने चाहते खूश झाले आहेत.या चित्रपटात कियारा झळकणार असल्याने चाहते देखील अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक करत आहेत.’डॉन 3’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा फरहान अख्तर हे सांभाळत आहेत.. याआधीच्या दोन्ही भागांचेही दिग्दर्शन फरहानने केले होते. आता तिसऱ्या भागात कमाल करण्यास फरहान सज्ज झाला आहे.अमिताभ बच्चन यांनी १९७८ मध्ये रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या २००६ मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खाननं डॉनची भूमिका साकारली.
२०११ मध्ये रिलीज झालेल्या डॉन २ चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता डॉन-3 चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.दरम्यान आता डॉन-3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यास कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.प्रेक्षकांना रणवीर आणि कियाराची केमिस्ट्री पसंतीस उतरते की नाही हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणारं आहे.
हे ही वाचा:
सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.