क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

बॉलीवूडचा किंग खान (Shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) याचे क्रूज पार्टी हे प्रकरण खूपच गाजले होते.

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

बॉलीवूडचा किंग खान (Shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) याचे क्रूज पार्टी हे प्रकरण खूपच गाजले होते. आता या प्रकरणाला बरेच दिवस झाले. परंतु आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजेच तत्कालीन एमसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक केली होती. आता समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. सीबीआयने केलेल्या तपासानुसार मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर आर्यन खानच्या प्रकरणांमध्ये समीर वानखेडे यांनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीबीआयने दिलेला माहितीनुसार, समीर वानखेडे आणि त्यांचे अन्य तीन सहकारी यांनी आर्यन खान कडून तब्बल २५ कोटींचे खंडणी मागितली होती अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी सुद्धा या विषयांवर भाष्य केले आहे. आर्यन खान लाच प्रकरणाबद्दल त्यांना विचारले असता एमसीबीच्या मादी अधिकाऱ्यांची पत्नी म्हणजेच क्रांती रेडकर हिने सांगितले की, समीर वानखेडेवरील आरोप चुकीचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. क्रांती रेडकरने पतीवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. क्रांती नेहमीच आपल्या घरचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर हिने मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. त्या व्हिडिओमुळे ती आता चर्चेत आली आहे. क्रांती अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडत असते क्रांती आर्यन खान प्रकरणावेळी ती समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version