Thursday, May 16, 2024

Latest Posts

महादेव बॅटिंग अँप प्रकरणात ”या” अभिनेत्याला अटक

महादेव बेटिंग अँपचा प्रसार केल्यामुळे अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता साहिल खानला  मुंबईला घेऊन येणार आहेत. अटकेपूर्वी जामीन मिळावा म्हणून साहिल खान न्यायालयात गेला होता पण त्याची याचिका मान्य केली नाही. महादेव ऑनलाईन गेमिंग – बेटिंग अँप या प्रकरणात ३१ पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. द लायन बुक अँप या एका अँपमध्ये साहिल खानची पॅटर्नशिप असल्याची माहिती पोलिसांनी मिळली आहे. त्यानंतर त्याच्यावर सतत लक्ष्य ठेवण्यात आले होते. साहिल खानची मुंबई पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे. १५ कोटींचा गैरव्यवहार या प्रकरणात झाला आहे. त्यानंतर काहीदिवसांनी ईडीने साहिलच्या मालमत्तांवर जप्ती केली होती.

न्यायालयाने अटकेपूर्वी याचिका रद्द केल्यानंतर साहिल खान मुंबईतून गायब झाला. गोवा, कर्नाटक, हैद्राबाद असा प्रवास करून तो दिल्लीमध्ये गेला. मुंबई पोलीस पण साहिल खानचा पाठलाग करत होते. छत्तीसगढ येथील जगदलपूरला गेल्यावर साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली .या महादेव बॅटिंग अँपची ६७ वेबसाइट ही परदेशात नियंत्रित करण्याचं काम सध्या सुरु आहे. या अँपची सूत्र बदलण्यासाठी वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करण्यात आला आहे. या अँपमधून खेळांवर पैसे लावून जिकंण्याचे स्वप्न दाखवण्यात येत होते. १७०० पेक्षा जास्त बँक खाते पैसे गोळाकरण्यासाठी उखडण्यात आली आहेत. अभिनेता साहिल खानवर अटकेनंतर कारवाई होणार का? आणि कोणती कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

SRH विरुद्ध मनासारखा स्कोर बनवता आला नाही, २०० हुन जास्त धावा ठोकूनही Ruturaj Gaikwad नाखूश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss