Tuesday, May 14, 2024

Latest Posts

मल्याळम अभिनेत्याने घेतली फाशी

पत्नीसोबतचा वाद आणि त्यामुळं असणाऱ्या नैराश्यामुळं अभिनेत्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

मल्याळम अभिनेता प्रसाद एन डी याने अनेक चित्रपटात काम केले आहे. अनेकांना त्याचा अभिनय फार आवडायचा तर अभिनेता प्रसाद एन डी ने मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अभिनेता एन डी प्रसाद  यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राहत्या घरासमोरच त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटनेमुळं मल्याळम कलासृष्टी हादरली आहे. कोच्ची येथील कलामास्सेरीमध्ये ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार अभिनेता कौटुंबीक प्रश्नांमुळे तणावाचा सामना करत होता.
त्याच्या मुलांनीच घराबाहेरच्या झाडावर मृतदेह लटकलेला पाहिला आणि त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. हा अभिनेता चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारत होता. पत्नीसोबतचा वाद आणि त्यामुळं असणाऱ्या नैराश्यामुळं अभिनेत्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांसाठी तो आणि पत्नी, विभक्त राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून तो उदास होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. प्रसाद यांच्यावर यापूर्वी अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप होता.
2021 मध्ये उत्पादन शुल्क विभागाने प्रसादला सिंथेटिक ड्रग्स ,चरस तेल आणि गांजा ताब्यात घेतल्याबद्दल अटक केली होती. याशिवाय त्याच्याकडून घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. प्रसाद यांनी ईबा आणि करमानी सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांची एक्शन हिरो बिजू या चित्रपटात खलनायक ची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती आणि तेव्हापासून प्रसाद ला ओळख मिळाली.

Latest Posts

Don't Miss