Saturday, July 27, 2024

Latest Posts

मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले धन्यवाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मराठा आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. आरक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आंदोलकांची डोकं न फोडता, ते न करता देखील आरक्षण देता येईल. आरक्षण मिळेल अशी मी आशा बाळगतो. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण दिल्यानंतर किती जणांना नोकऱ्या मिळतात हे पहावं लागणार आहे. ते न करता देखील आरक्षण देता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. छगन भुजबळ असो किंवा इतर कोणी असो दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एकमताने ठराव मंजूर केला होता. हायकोर्टात ते आरक्षण टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. टीम तीच होती आता आरक्षण टिकावे. टायमिंगच्या बरोबरीने वृत्ती महत्वाची असते. भाजपची वृत्ती चांगली असती तर त्यांच्यावर फोडाफोडीची वेळ आली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

यावर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, छगन भुजबळ असो किंवा इतर कोणी असो कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हायकोर्टात ते आरक्षण टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही.भाजपची वेळ चागंली असती तर तोडफोडीची वेळ आली नसती, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही; विजय वडेट्टीवारांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss