Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यात दीड दिवसांत ६०० किलो ड्रग्स जप्त, कुरकुंभमध्ये ड्रग्सचा अड्डा

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुणे हे शहर ड्रग्स कॅपिटल बनत चालले आहे. पुण्यात घडलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून दीड दिवसांमध्ये ११०० कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. कुरकुंभ एमआयडीसीमधील एका फॅक्टरीमध्ये ६०० किलोच्या आसपास ड्रग्ससाठा होता. पुण्यामध्ये आत्तापर्यंत करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे.

पुण्यातील विविध भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा करून ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ड्रग्स जप्त केल्यानंतर वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख यांना अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर एक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी आणि कुरकुंभमध्ये पोलिसांनी छापा टाकला आहे. कुरकुंभमध्ये ड्रग्सचा कारखाना असल्याचे एका आरोपींनी सांगितली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने कुरकुंभमधील कारखान्यात छापा टाकला. त्यावेळी ६०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन केमिकल एक्सपर्ट ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कंपनीतील साबळे नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्या कारवाईमध्ये ५५ किलो तर दुसऱ्या कारवाईमध्ये ६०० किलोहून अधिक साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ११०० कोटी रुपये आहे.

मुंबईमध्ये पॉल आणि ब्राऊन नावाच्या दोन ड्रॅग पेडलरवर कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण देशविदेशात मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. मुंबई आणि दिल्ली गुन्हे शाखेची पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदरने विश्रांतीसाठी एक गोडावून विकत घेतले होते, त्यामध्ये त्याने मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवला होता. मीठ निर्यातीच्या नावाखाली मेफेड्रोन ड्रग्सची तस्करी केली जात होती. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपासणी घेतली जात आहे. पुण्यातील ललित पाटील प्रकरण चांगलंच चर्चेत असताना पुन्हा एकदा ड्रग्स रॅकेट समोर समोर आले आहे.

हे ही वाचा:

चॉकलेट खाणं शरीरासाठी आहे फायदेशीर?डार्क चॉकलेट,की मिल्क चॉकलेट कोणतं ठरेल फायदेशीर जाणुन घ्या

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही; विजय वडेट्टीवारांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss