Prasad jawade दिसणार एका नव्या मालिकेत

कलर्स मराठीवर एक नवी मालिका येत आहे आणि त्या मालिकेचा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन ४ (Bigg Boss Marathi Season 4) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला प्रसाद जवादे (Prasad Jawade) आता पुन्हा एकदा एका नव्या लुकमध्ये आणि नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prasad jawade दिसणार एका नव्या मालिकेत

कलर्स मराठीवर एक नवी मालिका येत आहे आणि त्या मालिकेचा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन ४ (Bigg Boss Marathi Season 4) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला प्रसाद जवादे (Prasad Jawade) आता पुन्हा एकदा एका नव्या लुकमध्ये आणि नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “काव्यांजली-सखी सावली ” (Kavyanjali-Sakhi sawali) मालिकेमधील प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. त्या प्रोमोमधील प्रसाद जवादेचे डायलॉग पाहून त्याचे चाहते त्याच्या नवी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेमधील प्रसादचे नाव प्रीतम असे आहे.

“काव्यांजली-सखी सावली ” या मालिकेमध्ये दोन नायिका दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रीतम (प्रसाद) एका नायिकेला प्रपोसकरताना दिसत आहे तर दुसऱ्या नायिकेला प्रीतम आवडत आहे असे दाखवण्यात आले आहे. या तिघांचे प्रेमाचे नाते या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. बिग बॉस मराठी सिझन ४ नंतर पहिल्यांदाच प्रसाद जवादे मालिकेमध्ये त्यांच्या चाहत्याना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेसाठी प्रसादचे चाहते उत्सुक आहेत.

प्रसादला बिग बॉस मराठी सिझन ४ नंतर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. प्रसाद नेहमीच्या त्याच्या सोशल मीडियावर वर ऍक्टिव्ह असतो. त्याचबरोबर प्रसाद त्याच्या खासगी जीवनाबद्दल नेहमीच चर्चेत असतो आणि तो नेहमीच त्याची बिग बॉस मराठी मधील मैत्रीण अमृता देशमुख सोबत तो त्याचे फोटो शेयर करत असतो. त्याने बऱ्याच वेळा त्याने अमृता देशमुख बद्दल अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version