Thursday, May 16, 2024

Latest Posts

“लवकरच देशात बुलेट ट्रेन सुरु होणार”; जाहीर सभेत मोदींची घोषणा

"कॉंग्रेसने देशात ७ वर्ष राज्य केलं. पण मुलभूत सुविधा नव्हत्या."असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार,आप्पा बारणे, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर महासभेचं आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि इतर नेते देखील या सभेत उपस्थित होते. “कर्मभूमी असलेल्या भूमीला माझा नमस्कार”असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. “कॉंग्रेसने देशात ७ वर्ष राज्य केलं. पण मुलभूत सुविधा नव्हत्या.”असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.

पुढे ते म्हणाले की, “लवकरच देशातल्या बुलेट ट्रेन मध्ये बसण्याची संधी मिळेल. संशोधन करण्याऱ्यांसाठी एक लाख रुपयांची तरतूद बजेट मध्ये केली आहे.प्रत्येक क्षेत्रात भारताची प्रगती.मोदी सरकार आल्यावर देश आता मोबाईल निर्यात करतो. भारत इलेक्ट्रोनिक वाहनांचं हब बनणार. २०१४ नंतर महागाईवर नियंत्रण मिळवलं. देशाला तरुण पिढीवर विश्वास आहे.७० वर्षांवरील व्यक्तींवर मोफत उपचार करणार.कॉंग्रेसने नेहमी संविधानाचा अपमान केला. संविधान दिवस साजरा करण्यात कॉंग्रेसचा नेहमी विरोध होता. “असे म्हणाले.

“महाराष्ट्रात एक आत्मा आहे जी सरकार पाडण्यास मदत करते.१९९५ ला या आत्म्याने सेना-भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला”.ही आत्मा परिवारात आणि पक्षात ही वाद निर्माण करते.२०१९ ला देखील या आत्म्याने जनमताविरोधात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.” अशी नाव न घेता मोदींनी शरद पवारांवर (Sharad pawar)टीका केली. गरिबी कशी हटवली असं विचारल्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणतात “खटाखट”. कॉंग्रेस नजर ही सर्वसामान्यांच्या संपत्तीवर आहे. अशा शब्दात मोदींनी राहुल गांधीवर ताशेरे ओढेले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर “उद्धव ठाकरेंच्या गा़डीत फक्त आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे आणि शरद पवारांच्या गाडीत सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे.मात्र आपल्या गाडीत सगळ्यांसाठी जागा आहे.” असे म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली. “पुण्याला आधुनिक बनवण्याचे काम मोदींचे आहे. पुण्यात टॅक्नोलोजी हब आहे.देशाचं सर्वाधिक सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रात आहे.”तर “ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नसून मोदी विरुद्ध गांधी”अशी आहे. जेव्हा मोदी द्वारकेत गेले होते तेव्हा देखील त्यांनी देशाच्या हिताची प्रार्थनी केली. ही लढाई जगभरात मोदी विरुद्ध देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी अशी आहे. कॉंग्रेसने देशाला बुडवलं.करोडो  राम भक्च स्वप्न हे मोदींनी पूर्ण केले. विकासाचं दुसरं नाव म्हणजे “मोदी”२०१४ नंतर देशात एकही भ्रष्टाचार झालेला नाही. इथे फक्त मोदींची गॅरंटी चालते. मोदींकडे विकसित राज्य आहे आणि विरोधकांकडे  बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार आहे. विरोधकांकडे फक्त भ्रष्टाचाराची निती आहे.७ आणि १३ तारखेला ८० कोटी जनतेला रेशन देण्याचं काम होणार आहे. धनुष्यबाण, घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत. ७ आणि १३ तारखेला विरोधकांची हवा काढणार. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत सांगितले.

 

Latest Posts

Don't Miss