सुलोचना दीदींविषयी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

सुलोचना दीदींच्या निधनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे आणि सुलोचना दीदींना आदरांजली वाहिली आहे. अशी आई होणे नाही आणि अशी दीदी होणे नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

सुलोचना दीदींविषयी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर(Sulochana Latkar) यांचे रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांच्यावर बऱ्याच दिवसनपासून उपचार सुरू होते. अखेर काल त्याच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. सुलोचना दीदींच्या निधनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे आणि सुलोचना दीदींना आदरांजली वाहिली आहे. अशी आई होणे नाही आणि अशी दीदी होणे नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे. हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण ‘आई’ पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.

सुलोचना दीदी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. सुलोचना लाटकर यांना सुलोचना दीदी असे सर्व म्हणायचे. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी ४०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. सुलोचना दीदी या विशेषतः ‘आई’च्या भूमिकेसाठी ओळखल्या जात. आज सकाळी प्रभादेवी येथील राहत्या घरी सुलोचना दीदी यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version