Sunday, May 19, 2024

Latest Posts

दादा-ताईंच्या भेटीवर अमोल मिटकरींचा सवाल; ‘मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

आज देशभरात निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून बारामती हा त्यांच्यापैकी एक महत्वाचा मतदारसंघ असून यावर्षी बारामती मध्ये पवार वर्सेस पवारांची लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

आज देशभरात निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून बारामती हा त्यांच्यापैकी एक महत्वाचा मतदारसंघ असून यावर्षी बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे(Supriya sule ) तर अजित पवारांच्या गटाकडून सुनेत्रा पवार म्हणजे नणंद-भावजय निवडणूक लढवणार आहेत.

 बारामतीमध्ये अनेक बड्या नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी आपल्या आईसोबत मतदान केले. संपुर्ण पवार कुटुंबियांनी बारामतीत मतदान केले. सुप्रिया सुळे(Supriya sule) यांनी आपल्या वडिलांसोबत मतदानकेले आणि त्यानंतर त्या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. सुप्रिया सुळे (Supriya sule) अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले. तर विरोधकांनी ही राजकीय खेळी असल्याची टीका केली.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari ) यांनी एक्स पोस्ट करत सुप्रिया सुळें (Supriya sule )वर टीका केली आहे. ते म्हणाले की, “खासदार सुप्रियाताई सुळे आत्ताच आशाताई पवार यांना भेटायला काटेवाडीत गेल्याची बातमी कळली. या निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या दीड महिन्यापासून आशाताई बारामती परिसरातच आहेत. मग ही भेट मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे का? असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.

 

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी या सर्व चर्चांना उत्तर देत म्हणाले की, “ते माझं ही घर आहे. आम्ही भावंडं तिथेच वाढलो असून मी माझ्या काकूंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते’.अशा शब्दात विरोधकांना उत्तर दिले तर “आई माझ्यासोबत होती”असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)यांनी “ही एक भावनिक खेळी आहे.”अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

meta gala 2024 : आलिया भट्टचा नवा लुक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

EXCLUSIVE CM Eknath Shinde: उंटावरून शेळ्या हाकता येतात का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss