Sunday, May 19, 2024

Latest Posts

EXCLUSIVE CM Eknath Shinde: उंटावरून शेळ्या हाकता येतात का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

सोमवारी (६ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी Time Maharashtra ला विशेष मुलाखत दिली. टाइम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांना मुलाखत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा करत अनेक गौप्यस्फोट केले.

राज्यातील जनता महायुतीच्या (Mahayuti) पाठीशी भक्कमपणे उभा राहील का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील जनता विकासाबरोबर आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेला विकास आणि राज्यात दोन वर्षात केलेला विकास, सर्वसामान्यांसाठी सुरु केलेलया योजना, घेतलेले निर्णय याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही लोकांसमोर जातोय. घरी बसून सत्ता चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येत नाही. लोकांच्या वेदना आणि दुःख दूर करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? जमिनीवर यावे लागते. आमची महायुतीची टीम जमिनीवरून काम करणारी आहे. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे, जनता सुज्ञ आहे. जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी उभी राहते. निर्णय घेणाऱ्याच्या पाठीशी उभी आहे. तिकडे ना नियम, ना नीती, ना निर्णय, फक्त भ्रष्टाचार कसा करायचा,” असे बोलून त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना उबाठा गटावर (Shivsena UBT) ताशेरे ओढले.

ते पुढे म्हणाले, “मोदीजींचं नेशन फस्ट आणि देशाचा विकास फस्ट हा अजेंडा आहे. त्यामुळे लोक राज्यात आणि केंद्रात केलेलं काम बघून आमच्या पाठीशी उभे राहतील. घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवतील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यात जवळपास शंभरहून अधिक सभा घेतल्या आहेत. हि सावधानता आहे कि मोदींप्रती उत्तरदायित्व आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “निवडणूक निवडणुकीसारखी लढवायला लागते. आम्ही कॉन्फिडन्ट आहोत. नरेंद्र मोदी यांना आम्हाला पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. तेसुद्धा मोठ्या फरकाने… आम्ही पूर्णपणे थांपिंग मेजॉरिटी त्यांना देणार आहोत. ४०० पारचा नारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र यात कोठेही मागे पडणार नाही. म्हणून एक-एक सीट महत्वाची आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता बनूनच काम करतोय. हीच पोटदुखी विरोधकांच्या मनामध्ये आहे.”

“एकनाथ शिंदे एवढी मेहनत करतोय. कोल्हापूर, पुण्यात येऊन बसतोय. याला काय बंदी आहे का? एक कार्यकरता म्हणून मी कार्यकर्त्यांसाठी काम करतोय. आणि मी जिथे बसतो तिथे करेक्ट कार्यक्रम’ करतो. म्हणून यांना भीती.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हे ही वाचा:

Exclusive CM Eknath Shinde: कॉंग्रेसचा हात पाकिस्तान के साथ……

Exclusive Eknath Shinde: विरोधकांनी माझ्या कामाचा धसका घेतला कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss