Wednesday, May 15, 2024

Latest Posts

आलिया सारखं मला सुद्धा लवकर व्हायचंय प्रेग्नंट

Rakhi want to get pregnant early

अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या सतत ड्रामामुळे नेहमीच चर्चेत असते.राखी कडे पाहिल्यावर तिच्या आयुष्यातला ड्रामा कधी संपणार नाही असं अनेकांना वाटतं.राखी अनेकदा सोशल मीडियावर इमोशनल झालेली पण पाहायला मिळते.तिचं प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र होत असते.तर सध्या राखी आदिल दुर्लनी ला डेट करत आहे.तिने त्याची ओळख देखील सोशल मीडियावर करून दिली आहे.तर आता राखी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.राखी आणि आदिल हे दोघेही मंगळवारी एका रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाल्यावर अनेक पत्रकारांनी राखीला तिच्या तब्येत बद्दल चौकशी केली.

तर सध्या बॉलिवूड अभिनेते रणबीर आणि आलिया लवकरच आई बाबा होणार हे समजल्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.तर तिला देखील आलिया सारखं लवकरच आई व्हायचंय असं तिने मीडिया समोर सांगितले.आमचं अजूनही लग्न झालेलं नाही पण लग्नाअगोदर मी प्रेग्नंट राहीली तरी मला चालेल.मी प्रेग्नंट आहे हे जेव्हा मला कळेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी लग्न करेन.मला सुद्धा आई व्हायचंय आणि मला सुद्धा माझ्या आयुष्यात आनंद हवाय असं गंमतीत राखी मीडिया समोर बोलली सध्या तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर बरंच चर्चेत ठरतंय तर काहींना हसू आवरता येत नाहीये.

राखी आणि आदिल हे दोघे लग्न कधी करणार हा चाहत्यांचा प्रश्न आहे तर काही दिवसांपूर्वीच आदिल ने राखी ला दुबई मध्ये एक आलिशान घर गिफ़्ट केलं हे गिफ्ट पाहून राखी भरपूर खुश झाली.त्यावेळी तिने तिच्या घराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.आदिल माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असला तरीही त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.आदिल हा उद्योगपती असून त्याची बहीण शैली ही माझी चांगली मैत्रीण आहे तिच्यामुळेच आम्ही एकत्र आलो असं राखीन सांगितले.

 

Latest Posts

Don't Miss