Sunday, March 3, 2024

Latest Posts

ख्रिसमसचा केक कट करताना त्यावर दारु ओतून आग लावत ‘जय मात’दी घोषणा दिल्याने रणबीर नेटकऱ्यांकडून ट्रोल

सध्या रणबीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत ला आहे.त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर ख्रिसमसचा केक कट करताना 'जय माता दी'चा जयघोष करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा ‘अॅनिमल’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशामुळे तर चर्चेत आहेच.हा चित्रपटान बॉक्स ऑफिसवर अगदी धुमाकुळ घातला आहे.तर सध्या रणबीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत ला आहे.त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर ख्रिसमसचा केक कट करताना ‘जय माता दी’चा जयघोष करताना दिसत आहे.त्यामुळे नेटकरी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.हा  व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

रणबीर कपूरचं सध्या  ‘अॅनिमल’ चित्रपटातील अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर आणि आलियाने आपली लेक राहाचा चेहरा चाहत्यांसमोर आणला असल्याने चाहते देखील खूश झाले. रणबीर आणि आलियाच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आता चेकीची पहिली झलक त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राहाच्या गोंडसपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान एका कृतीमुळे रणबीरला मात्र ट्रोल करण्यात येत आहे.

कपूर कुटुंबात काही दिवसांपूर्वी ख्रिसमस लंचचं आयोजन करण्यात आलं होतं. या विशेष कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. त्यांचा क्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर केकवर वाइन टाकताना दिसत आहे. हा केक कापताना रणबीर ‘जय माता दी’च्या घोषणा देताना दिसत आहे. रणबीरसह या व्हिडीओमध्ये कुणाल कपूर, नव्या नवेली नंदा, आदर जैन आणि जहान दिसून येत आहेत.

रणबीर कपूरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्याने दिलेल्या ‘जय माता दी’च्या घोषणेमुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दारू आणि जय माता दी’च्या घोषणा देणं योग्य नाही, सुपरस्टार बोलून आपणच त्यांना आदर्श मानतो , नशेत जय माता दीच्या घोषणा देणं योग्य नाही,  , ‘यांना पकडून मारायला हवं…,’चांगल्या कामासाठी देवीचं नाव घ्यायला हवं, असं म्हणत नेटकऱ्यांनी रणबीरला चांगलच ट्रोल केलं आहे.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फक्त रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबाची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. सध्या रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली चांगलीच हवा दाखवली. फक्त भारतात नाही तर, जगभरात ‘ॲनिमल’ सिनेमाने मोठी कमाई केली. सिनेमातील रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीनची तुफान चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

Manoj jarange Patil म्हणाले, जालना ते मुंबई अंतर ३५० किमीपेक्षा जास्त…

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर बोटीत गुदमरून दोघांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss