Saturday, March 2, 2024

Latest Posts

Manoj jarange Patil म्हणाले, जालना ते मुंबई अंतर ३५० किमीपेक्षा जास्त…

सध्या राज्यात मराठा आरक्षण या मुद्यावरून चांगलंच महायुद्ध सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil ) हे त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत

सध्या राज्यात मराठा आरक्षण या मुद्यावरून चांगलंच महायुद्ध सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil ) हे त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आणि त्याच साठी मनोज जरांगे हे त्याच्या गावातून मुंबईच्या दिशेने दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी रवाना होणार आहेत. तर ते मुंबईत मुंबईत दिनांक २६ जानेवारीला पोहोचण्याच लक्ष्य आहे. मुंबईतील आंदोलनाबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

या संदर्भात माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले आहेत की, एका दिवसात ६० किमी अंतर चालाव लागणार आहे. असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. हे शक्य होईल का? अनेक लोकांना त्रास होऊ शकतो यावर लोकांच्या हिशोबाने चालू असं उत्तर मनोज जरांगे यांनी दिलं. “मुंबईत चाललोय. आता गोळ्या घातल्या तरी आरक्षणाशिवाय माघार नाही. मी माझ्या समाजासाठी ताकत, जीव पणाला लावायला तयार आहे. पोरांची संधी गेली, तर हाल होतील. म्हणून मराठा समजाला आवाहन आहे की, त्यांनी आपण आहोत तो पर्यंत आरक्षण मिळवून देऊ, नंतर हाल होतील आताच सावध व्हा. नाईलाज आहे. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, घरी बसू नका. आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील” असं मनोज जरांगे म्हणाले.

कधी राज्यात छगन भुजबत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद दिसून येतात तर कधी आणखी कोना सोबत आता विखे पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे आणि त्याच्या या वक्तव्याला जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. “मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळाल पाहिजे. ५० टक्क्यांच्या वर गेलं की आरक्षण उडतं” असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांची भूमिका धरसोडपणाची आहे, त्यांना मुंबईला येण्याची गरज नाही, असं विखे पाटील म्हणाले. “उगाच मागे बोलू नका. धरसोडपणा तुम्ही केला. सगळ्या महाराष्ट्रात सॉफ्टवेअर का नाही दिले? त्यामुळे मोडी लिपीद्वारे नोंदी तपासता आल्या असत्या” असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलं. “२० तारखेच्या आत आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघाला, तर मुंबईत जाण्याची गरजच उरणार नाही. आमच्या पोरांच वाटोळ होईल म्हणून आम्ही आरक्षणावर ठाम आहोत” असं जरांगे पाटील म्हणाले.

तसेच मनोज जरांगे पुढे म्हणाले आहेत की, मागास आयोगाने फक्त मराठा समाजाच नाही, इतर समाजाच सुद्धा मागसलेपण तपासणार असं म्हटलय. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मागास आहेत की नाही हे तपासण गरजेच आहे. हे माझ व्यक्तीगत मत आहे” “सरकारने ठरवलय ते सरकारच्या हातात आहे. सरकारच्या डोक्यात, मनात जे आहे, ते करतय. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याच सिद्ध झालय, तर कशाला विनाकारण फुफाटयात ढकलताय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss