Ruturaj Gaikwad झाला विवाहबद्ध!, लग्नानंतर Sayali Sanjeev ची पोस्ट चर्चेत…

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा भारतीय फलंदाज त्याच सोबत आपल्या खेळीने मैदान गाजवणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) विवाहबंधनात अडकला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने देखील या नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Ruturaj Gaikwad झाला विवाहबद्ध!, लग्नानंतर Sayali Sanjeev ची पोस्ट चर्चेत…

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा भारतीय फलंदाज त्याच सोबत आपल्या खेळीने मैदान गाजवणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराज गायकवाड यांनी महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उत्कर्षा पवारशी (Utkarsha Pawar) लग्न (Wedding) केले आहे. २६ वर्षीय ऋतुराज गायकवाडने शनिवारी, दिनांक ३ जून रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न केले आणि लग्नाचे फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले. ही छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गेले दोन-तीन दिवस त्याच्या लग्न समारंभाच्या मेहंदी, हळद अशा विविध कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. सध्या त्याच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने देखील या नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गायकवाड हे उत्कर्षाला बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते आणि काल तिच्याशी लग्न केले. उत्कर्षा आयपीएलचे सामने पाहण्यासाठी आणि गायकवाडांना चिअर करण्यासाठी अनेकदा यायची. IPL 2023 च्या फायनल मॅचमध्ये देखील उत्कर्षा मॅच पाहण्यासाठी आली होती. सामना संपल्यानंतर गायकवाड यांनी स्वतः ट्रॉफी हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गायकवाड आणि उत्कर्षा यांचे महाबळेश्वर येथे लग्न झाले. दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version