Saturday, March 2, 2024

Latest Posts

Happy birthday salman khan: भाईजान वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी प्रोजेक्टची करणार घोषणा,चाहत्यांसाठी पर्वणी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसाठी आजचा दिवस खुप खास असणार आहे. आज सलमान खान आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून भाईजानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आजच्या खास दिवशी सलमान खान त्याच्या चाहत्यांना देखील खास गिफ्ट तर देणारचं.दरम्यान चाहते देखील सलमान खानच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अनेक चाहते दरवर्षी न चुकता भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मोठे-मोठे पोस्टर्स घेऊन ते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभे असतात.आणि आपल्या लाडक्या सुपरस्टारला वाढदिवसाच्या त्यांच्या अंदाजात शुभेच्छा देत असतात.

दरम्यान या दिवशी सलमान खान आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. बाल्कनीत येत तो चाहत्यांना भेटतो. सलमानने अनेकदा आपल्या वाढदिवशी आगामी सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे यंदाची सलमीन आपल्या आगामी सिनेमाची घोषणा करत चाहत्याना भेट देणार का का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सलमान खानचे 2023 मध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. पण 2024 हे वर्ष भाईजानसाठी नक्कीच खास असणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मध्ये सलमानचे एक-दोन नव्हे तर पाच बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. भाईजान आज आपल्या वाढदिवसानिमित्त या सिनेमांची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

करण जोहर आणि सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात सलमान खान काम करणार आहे. तसेच यशराज फिल्म्सच्या ‘टायगर वर्सेस पठाण’ या सिनेमातही करण जोहर दिसणार आहे. शाहरुख खान आणि सलमान एका सिनेमात काम करणार आहेत. 25 वर्षांनंतर सलमान खान आणि करण जोहर एकत्र काम करणार आहेत. ‘दबंग 4’ आणि ‘किक 2’ या सिनेमांची सलमान खान घोषणा करू शकतो, असे म्हटले जात आहे.

सलमान खाननं आपल्या अभिनयशैलीतून  कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे..सलमानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. ‘बीवी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाली. सलमानच्या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.सरत्या वर्षात सलमानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हवी तेवढी कमाई केली नाही,मात्र आता येणारं हे २०२४या वर्षात सलमानचे बीग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादु दाखवणार का ? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss