Saturday, March 2, 2024

Latest Posts

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  वरुण धवन हा नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.दरम्यान लवकरच वरुणचा ‘VD 18’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘VD 18’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमार करत आहेत.तर नुकतीच वरुणबाबत एक बातमी समोर आली आहे,या चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.या चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये सुरु आहे.

वरुण धवन हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो,तो त्याचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो.दरम्यान वरुणचा चाहता वर्ग देखीव मोठा आहे.तर नुकतच त्याने त्याच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वरुण धवन हा VD 18 या चित्रपटाच्या सेटवर एकदा नाही तर  चौथ्यांदा जखमी झाला आहे.वरुण धवनने नुकताच त्याच्या पायाचा फोटो इंस्टाग्रामवर  शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या पायावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या फोटोला वरुणनं कॅप्शन दिलं, ‘शूटवरील आणखी एक दिवस… vd18.’ वरुणने ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो सेटवर जखमी झाला होता.

वरुण धवन सप्टेंबरमध्ये ‘VD 18’ च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. सेटवर वरुणच्या पायाला दुखापत झाली. तसेच वरुणला काही दिवसांपूर्वी देखील पायाला दुखापत झाली होती. आता पुन्हा वरुणच्या पायाला दुखापत झाली आहे. VD 18 या चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.  मार्च 2024 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल,अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे. पण अजून  VD 18 या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. ‘VD 18’ हा तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे.

‘VD 18’ या चित्रपटाच्या व्यतिरिक्त वरुण हा ‘Citadel India’ या वेब सीरिजमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘VD 18’  या चित्रपटाद्वारे वरुण हा पहिल्यांदाच अॅटलीसोबत काम करत आहे. याआधी अॅटलीचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता अॅटलीच्या VD 18 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? तसचं वरुणचा  VD 18 चित्रपट  बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवणार का ? हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Happy birthday  ; भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss