Sara Ali Khan हिंदू मंदिरात गेल्यामुळे झाली ट्रोल

सध्या चर्चेत असलेला 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि विकी कौशल हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Sara Ali Khan हिंदू मंदिरात गेल्यामुळे झाली ट्रोल

सध्या चर्चेत असलेला ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि विकी कौशल हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट आजच रिलीज झाला आहे. सारा अली खान नेहमीच ती आपल्या सोशल मीडियावर ती जात असलेल्या ठिकाणांचे फोटोस आणि व्हिडीओ शेअर करत असते. सारा ही काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अजमेर शरीफ दर्गामध्ये गेली होती. तेव्हाचे तिचे अनेक चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. विकी कौशल आणि सारा अली खान दोघेही प्रमोशनच्या दरम्यान धमाल करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. चित्रपटाचे प्रमोशन करताना सारा अनेक मंदिरांमध्ये दर्शन करताना दिसली. साराने मंदिरामध्ये दर्शन घेतल्यामुळे साराला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सारा अली खान हिने मंदिरामध्ये जाणे हे लोकांना अजिबात आवडलेले नाही. एवढेच नाही तर अनेकांनी तिला धर्माबद्दल देखील कमेंट्स केल्या आहेत. परंतु असे नाही की सारा पहिल्यादा कोणत्या मंदिरामध्ये गेली आहे जर तिचे इंस्टाग्राम चेक केले तर ती याआधी सुद्धा अनेक मंदिरांमध्ये गेली आहे आणि तिने देवाचे दर्शन देखील घेतले आहे.

सारा आली खान याआधी गुरुद्वारा, मंदिरे आणि दर्गात सारा अली खान ही नेहमीच जात असते. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत की, तू हिंदू मंदिरामध्ये कशी काय जातेस. सारा अली खानची आई अमृता सिंह ही हिंदू आहे आणि सैफ अली खान हे मुस्लिम आहेत. साराची आई हिंदू असल्यामुळे सारा मंदिरात जात असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर सारा दर्गात देखील नेहमीच जाते असते.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version