Friday, May 17, 2024

Latest Posts

झी गौरव पुरस्कार सोहळ्यात अमेय वाघने वाचलेली कविता ऐकून श्रेयस आणि दिप्तीला अश्रू अनावर!

नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात मोठा झी गौरव पुरस्कार २०२४ हा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात मोठा झी गौरव पुरस्कार २०२४ हा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.झी गौरव पुरस्कार सोहळा म्हंटलं तर या सोहळ्यात बॉलीवूड कलाकार देखील विशेष उपस्थिती दर्शवतात.तर यावेळी,सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सोरा अली खाननची देखील खास उपस्थिती होती.सारा आणि शिल्पाने या सोहळ्यात परफॉर्मन्स करुन सोहळ्यात अधिक रंग भरले.

सध्या सोशल मीडियावर झी चित्र  गौरव पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. अशातच एक खास गोष्ट या मंचावर घडली ती म्हणजे मृत्युला ठोकर देऊन परतलेल्या श्रेयस तळपदेसाठी अमेय वागणे छान अशी कविता साधर केली आणि या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.

अभिनेता श्रेयस तळपदेची तब्येत आता पूर्ववत होत असल्याने सिने इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रमंडळींना व चाहत्यांना सुद्धा चांगल वाटत आहे. तसं पाहायला गेल्यास एक प्रकारे श्रेयसचा हा पुनर्जन्मच होता. अमेयने ऐकवलेल्या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. तर श्रेयस व त्याची पत्नी दीप्तीला सुद्धा अगदी भरून आले होते. ही कविता ऐकून अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी उभ राहून प्रतिसाद दिला.

अमेयने म्हटलेल्या कवितेचे बोल होते की, “संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत…हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे….. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.”

श्रेयसला डिसेंबर महिन्यात वेलकम टू द जंगल चे शूटिंग सुरू असताना हार्ट अटॅक आला होता.. घरी परतत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. असे म्हटले जाते की त्यावेळी १० मिनिटांसाठी श्रेयसचे हृदय बंद पडलेले. तेव्हा श्रेयस च्या पत्नीने प्रसंगावधान राखून त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले व वेळीच उपचार सुरू केले.

त्यावेळी श्रेयसला मुंबईतील लोकांनी तो कोण आहे हे न पाहताच अगदी मनमोकळेपणाने मदत केलेली. त्या सर्वांचे श्रेयस व त्याच्या पत्नीने आभारही मानलेले. इंडस्ट्रीतील कलाकारांनीही श्रेयससाठी मदतीचा हात पुढे केलेला, त्याच्यासाठी प्रार्थना केलेली. आपला लाडका अभिनेता बरा झाल्याचे पाहून त्याच्या फॅन्सना सुद्धा फार बरे वाटले. श्रेयसचा नुकताच ही अनोखी गाठ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे ज्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसादही मिळतोय.

हे ही वाचा:

आंबेडकर की ठाकरे? कोणत्या स्थानकाला कोणाचे नाव? | Railway Stations | Mumbai | Balasaheb Thackeray

Rahul Gandhi मुंबईत येण्याआधीच Sanjay Nirupam यांची ‘कल्टी’, Fadnavis दाखवणार दिशा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss