Siddharth Malhotra ने पार पाडली नवरा होण्याची जबाबदारी

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि बॉलीवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांच्या लग्नाला नुकतेच ३ महिने झाले आहेत.

Siddharth Malhotra ने पार पाडली नवरा होण्याची जबाबदारी

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि बॉलीवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांच्या लग्नाला नुकतेच ३ महिने झाले आहेत. लग्नानंतर ते दोघेही फार कमी पाहायला मिळाले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा लग्नानंतर ते दोघेही त्यांच्या शूट मध्ये व्यस्त आहेत. ते कधी तरी दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. अभिनेता सिद्धार्थने नुकताच एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामध्ये तो त्याच्या पत्नीची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.

अभिनेता सिद्धार्थने त्या फोटो खाली लिहिले होते की ‘लवकर काहीतरी खाऊया, पुन्हा बॅग उचलायला जायचं आहे. या ट्रीटबद्दल थँक्यू कियारा’. सिद्धार्थ नवरा असण्याचे कर्तव्य बजावताना या फोटोमध्ये दिसत आहे. हा सिद्धार्थचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थ च्या फोटोमध्ये त्याच्या अनेक बँग्स त्याने घेतलेल्या आहेत आणि आता या फोटोवर अनेक चर्चा रंगल्या आहेत. सिद्धार्थ रस्त्याच्या कडेला अनेक बँग्स खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचबरोबर त्याने कियाराला टॅग करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

सिद्धार्थ आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा काहीतरी खाताना दिसत आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट निळ्या रंगाच्या ट्राऊजरसह घातला आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा पहिला चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होत आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version