Tuesday, April 16, 2024

Latest Posts

छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची पर्वणी,’ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

छोट्या पडद्यावरील मालिका पाहणं म्हणजे प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन होत असतं अशातच आता अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणासाठी सज्ज झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिका पाहणं म्हणजे प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन होत असतं अशातच आता अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणासाठी सज्ज झाले आहेत.नव्या मालिकांमुळे आता जुन्या मालिका बंद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.स्टार प्रवाह ही वाहिनीने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.त्यामुळे नव्या मालिकेमुळे कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आता स्टार प्रवाहवर ‘ ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन मालिका १८ मार्च पासून सुरू होणार आहेत. रेश्मा शिंदे, सविता प्रभूणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे यांची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे.

आता सात महिन्यापूर्वी सुरू झालेली ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं जातं आहे. १८ जुलै रोजी सुरू झालेली ही मालिका आता वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ऑफ एअर होणार असल्याचं म्हटलं जातंय. अभिनेता हर्षद अतकरी, शर्वरी जोग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील गुंजा आणि कबीर यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र आता ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती आहे. अजून मालिकेची पुढील कथा बाकी आहे. यासोबतच मालिकेचा टीआरपीदेखील चांगला आहे. टीआरपी यादीत ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल निर्माते काय निर्णय घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.आता ही मालिका खरंच बंद होणार की या मालिकेची देखील वेळ बदलण्यात येणार हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेच्या वेळेवर ‘साधी माणसं’ ही नवी मालिका प्रसारीत होणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे दोघेही या मालिकेत एकत्र काम करणार आहेत.  शिवानी बावकर ही मीराच्या भूमिकेत तर आकाश नलावडे हा सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.सध्या या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांची मालिकाबाबतची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा: 

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

‘डॉन ३’ मध्ये रणवीर सिंहसोबत झळकणार कियारा अडवाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss