Saturday, July 27, 2024

Latest Posts

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर(Mahabaleshwar)जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर(Mahabaleshwar)जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पॅराग्लायडिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १८ फेब्रुवारीला पाचगणीमधील बिली मोरया शाळेच्या पटांगणावर पार पडला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ (Paragliding Pre World Cup) या स्पर्धेचे आयोजन केले होते. टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्या तर्फे ही पॅराग्लायडिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

१८ फेब्रुवारीला पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं रंग की चव? असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मला रंग काय सगळंच आवडत. स्ट्रॅाबेरी खायला आवडते. स्ट्रॅाबेरी फक्त बघून होत नाही तर ती खालली पाहिजे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॅाबेरी विथ क्रीम सगळ्यात भारी असते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाईम महाराष्ट्र,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या वतीने महाबळेश्वर जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॅराग्लायडिंगसाठी वेगवेगळ्या देशातील सुमारे १५० पायलट पाचगणीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झाले. पाचगणीमधील पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, जीवन गलांडे, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे उपस्थित होते. तसेच महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळ्याला ‘प्रोजेक्ट देव डी बँड’ च्या सुरेल मैफिलीत हा कार्यक्रम पार पडला. स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा:

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss