Friday, May 17, 2024

Latest Posts

‘महादेव’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित,अंकुश चौधरी दिसणार नव्या भूमिकेत

महादेव या चित्रपटात अंकूश मुख्य भुमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.अंकुशने आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचे पैलू प्रेक्षकांसमोर मांडणारा अभिनेता अंकुश चौधरी लवकरच एका नव्या कोऱ्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महादेव या चित्रपटात अंकूश मुख्य भुमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.अंकुशने आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.अंकुशच्या भुमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात या कायम घर करत असतात.त्यांना साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्यांच पसंतीस उतरल्या आहेत.

अशातच आता स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’ चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी ‘महादेव’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते. संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर  सहनिर्माते आहेत.

मोशन पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसत असून यात महादेवाचे कोणते रूप पाहायला मिळणार आहे, हे येत्या काळात कळेल.चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणतात, ” आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु ‘महादेव’मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.”

सध्या अंकुश छोट्या पडद्यावरील मी होणार सुपरस्टार या  डान्स रिएलिटी शोमध्ये सुपर जर्ज म्हणुन दिसुन येत आहे.तसचं अंकुश सोशल मीडियावर सक्रिय असतो,तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.अंकुशचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.महादेव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.दरम्यान आता महादेव या चित्रपटात साकारत असलेल्या आगळ्या वेगळ्या भुमिकेत अंकुशला पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

बारामती डॅमेज केलं तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू;अजित पवार गटाकडून एकनाथ शिंदेंना इशारा

सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज,नव्या फोटोंची चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss