Saturday, May 18, 2024

Latest Posts

Bigg Boss OTT 2 च्या विनरला मिळणार लाखांचे बक्षीस

सध्या टेलिव्हिजनवरचा बहुचर्चित रिऍलिटी शो बिग बॉस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटी सीजन २ (Bigg Boss OTT 2) धमाल करताना दिसत आहे.

सध्या टेलिव्हिजनवरचा बहुचर्चित रिऍलिटी शो बिग बॉस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटी सीजन २ (Bigg Boss OTT 2) धमाल करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद हा देखील बघायला मिळतोय. बिग बॉस ओटीटी सिझन २ सलमान खान होस्ट करत आहे. सलमान खान याचा बिग बॉस ओटीटी २ च्या मंचावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या नंतर सलमान खान यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये सिगारेट दिसत असल्याने लोकांनी सलमानला चांगलेच सुनावले आहे.

रिपोर्टनुसार बिग बॉस ओटीटी २ मधील सिगारेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सलमान खान याने निर्मात्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. मागील विकेंडच्या वारला सलमान खान हा शो होस्ट करताना दिसला नसल्यामुळे अनेकांनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळेच सलमान खान याने शोला रामराम केल्याचे म्हटले होते. अनेकांनी चक्क बिग बॉस ओटीटी २ च्या मंचावर सलमान खान हा सिगारेट ओढताना दिसल्याने त्याच्यावर टिका केली. आता बिग बॉस ओटीटी २ च्या फिनालेबद्दल अपडेट आले असून आॅगस्टमध्ये बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले होणार आहे.

बिग बॉस ओटीटी २ च्या विजेत्याला तगडे पैसे देखील मिळणार आहेत. २५ लाख रुपये बिग बॉस ओटीटी २ च्या विजेत्याला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉस ओटीटी २ च्या घरात आकांक्षा पुरी ही देखील सहभागी झाली होती. मात्र, बिग बॉस ओटीटीच्या घरात असताना आकांक्षा पुरी ही मोठ्या वादात सापडली. थेट एका टास्टमध्ये लिपलाॅक करताना आकांक्षा पुरी ही दिसली. विशेष म्हणजे घरातील सदस्यांसमोरच नाही तर चक्क कॅमेऱ्यासमोर आकांक्षा पुरी हिने लिपलाॅक केले.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

दिल्लीत होणाऱ्या NDA बैठकीला, Eknath Shinde – Ajit Pawar लावणार हजेरी

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss