“The Kerala Story” चित्रपटावरून दोन कलाकार भिडले

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) हे त्यांच्या चित्रपटामधील साकारलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. नसिरुद्दीन शहा हे फक्त अभिनयामध्येच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये देखील सक्रिय सहभाग घेत असतात.

“The Kerala Story” चित्रपटावरून दोन कलाकार भिडले

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) हे त्यांच्या चित्रपटामधील साकारलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. नसिरुद्दीन शहा हे फक्त अभिनयामध्येच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये देखील सक्रिय सहभाग घेत असतात. आता नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या एका विधानावरून अडचणीत आले आहेत आहे. मागील अनेक दिवसापासून द केरला स्टोरी चित्रपट प्रचंड व्हायरल होत आहे. हा चित्रपट अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाला विरोध देखील केला.

या चित्रपटावर अनेक कलाकारांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आता नसिरुद्दीन शहा यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून द केरला स्टोरी चित्रपटावर अनेक चर्चा होत आहेत. द केरला स्टोरी चित्रपटांवर नसिरुद्दीन शहा म्हणाले की, कोणत्याही कलाकाराने “द केरला स्टोरी” सारख्या चित्रपटाचा भाग होऊ नये. म्हणून नसिरुद्दीन शहा यांनी हा चित्रपट अजून पहिला नाही असे सांगण्यात येत आहे.

नसिरुद्दीन शहा यांच्या या वक्तव्यावर भोजपुरी कलाकार आणि भाजपचे खासदार मनोज तिवारींची (Manoj Tiwari) खोचक प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या विधानावर मनोज तिवारी म्हणाले की, नसिरुद्दीन शहा यांची नियतच खोटी आहे. ते भलेही चांगले कलाकार आहेत परंतु त्यांची विचारसरणी ही चांगली नाही. जर नसिरुद्दीन शहा यांना द केरला स्टोरी चित्रपटाच्या संबंधित काही शंका आहे तर ते कोर्टात जाऊ शकतात असे मनोज तिवारी म्हणाले. मनोज तिवारी यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version