Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Nashik महापालिकेत भूसंपादन घोटाळा, ८०० कोटींचा गैरव्यवहार, Sanjay Raut यांचे गंभीर आरोप

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार, ६ मे) पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर (Mahayuti) टीका केली. नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा झाला असून त्यातून ८०० कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे. याबाबत दोन दिवसात पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, ” नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले आठशे कोटीचे गैरव्यवहार, नाशिक मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले? यासंदर्भात माझं काम चालू आहे याबाबत रीतसर तक्रार मी करत आहे. नगर विकास खात मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे. मग ते ठाकरे सरकार असताना किंवा आता सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाप्रकारे घोटाळे होत आहेत. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहे सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे त्याचा खुलासा आम्ही करणार आहोत.”

ते पुढे म्हणाले, “विशेषतः नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैर मार्गाने गोळा केले. हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा मग शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोहोचत आहे? हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासहित देणार आहे. नगर विकास खात्याचा घोटाळा, सरकार कोणाचही असेल नगर विकास मंत्री तेच होते आणि तेच आहेत. साधारण 17 ते 18 महत्त्वाचे बिल्डर आहेत. जे शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत. त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला, शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. भूसंपादनाचे बिल्डरांना पैसे मिळाले. हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत. समृद्धी मध्ये देखील तेच झालेल आहे आणि काही ठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत हेच होत आहे. मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाच एक प्रकरण देणार आहे. त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललं आहे? ते तुम्हाला कळेल.”

मुंबईमधील गिरगाव येथील एका कंपनीने नोकरीची जाहिरात तटाकळी होती. त्या जाहिरातीत ‘मराठी उमेदवारांना प्रवेश नाही’ असे स्पष्टपणे लिहिले होते. याबाबत बोलताना म्हणाले, “मुंबईमध्ये एका गुजराती कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करू नये, मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी. जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली, जी शिवसेना मोदी शाह यांनी तोडली याच कारणासाठी, मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात, बुळचट शिवसेना या विषयावर गप्प आहे. हिम्मत असेल तर आवाज द्या, नाहीतर आम्ही बघतो काय करायचं आहे ते.”

हे ही वाचा:

Vijay Wadettiwar यांच्या वक्तव्यावरून BJP आक्रमक, नागपुरात पुतळा दहन करून केला निषेध व्यक्त

Ajit Pawar यांनी रडण्याची ऍक्टिंग करून उडवली खिल्ली, Rohit Pawar यांनी दिले प्रत्युत्तर, तुमच्यासारखे मगरीचे नरकाश्रू नाहीत!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss