सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे नाव वापरुन अनेक फसवणुक होत असल्याच्या धक्कादायक बातम्या सामोर येत आहेत.दरम्यान आता अभिनेत्री विद्या बालनसोबतची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींचे डीफ फेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्याची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानापासून झाली होती. त्यात आलिया भट्ट पर्यत अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.दरम्यान आता प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या नावानं सोशल मीडियावर फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर विद्या बालनने संबंधित संशयित आरोपीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. विद्या बालनचे नाव घेत फसवणूक झाल्याचे तिचे म्हणणे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विद्या बालनने अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केली आहे. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, विद्या बालनचं फेक अकाऊंट तयार करण्यात आलं असून तिच्या या खोट्या अकाऊंटद्वारे लोकांकडे पैशांची मागणी केली जात आहे.आरोपीने विद्या बालनच्या नावाने जे इन्स्टा अकाऊंट बनवलं, त्याद्वारे लोकांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैशांची मागणी केली जात आहे. खार पोलिसांनी याप्रकरणी आयटी कायद्याच्या कलम ६६ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अनेक वेळा सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.विद्या बालनच्या फेक अकाऊंटवरुन फसवणूक करणाऱ्याने इंडस्ट्रीत काम देण्याचं आमिष दाखवून लोकांशी संपर्क केला. नोकरी देण्याचं सांगून लोकांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे.एका डिझायनरने अभिनेत्रीला तिचा व्हॉट्सअॅप मेसेज आल्याचं सांगितलं. त्या मेसेजमध्ये ती विद्या बालन बोलत असल्याचाही दावा केला होता. त्यासोबत काम मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. डिझायनरने या मेसेजबाबत अभिनेत्रीला सांगितल्यानंतर, हा मेसेज आपण केला नसल्याचं विद्या बालनने त्याला सांगितलं.
फेक अकाऊंटची माहिती मिळाल्यानंतर विद्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान अभिनेत्रीला अनेकांना तिच्या नावाने मेसेज गेल्याचं समजलं. विद्या बालनच्या फेक इन्स्टाग्रामसह फेक जीमेल अकाऊंटदेखील बनवण्यात आलं आहे.विद्या बालन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.सोशल मीडियावर तिचा तिचा चाहतावर्ग मोठा आहे.विद्या बालन आता, पुन्हा मंजुलिकेच्या भूमिकेतून भूल भुलैया 3 या चित्रपटीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे ही वाचा:
EXCLUSIVE :मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो- एकनाथ शिंदे
विराट कोहली –अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा झाले आई-बाबा, पुत्ररत्नाचा लाभ