Wednesday, April 24, 2024

Latest Posts

विराट कोहली –अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा झाले आई-बाबा, पुत्ररत्नाचा लाभ

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झालं आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झालं आहे.अनुष्काने १५ फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला.विराट आणि अनुष्काला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.याबाबतची पोस्ट अनुष्काने २० फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत  शेअर केली.विराटने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या धाकट्या मुलाचे स्वागत केले असून त्यांनी त्याचे नाव ‘अकाय’ असे ठेवले. विराट-अनुष्काच्या पहिल्या मुलीचे नाव ‘वामिका’ असून त्यांनी दुसऱ्या मुलासाठीही हटके नाव निवडले आहे. आता ‘अकाय’चा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा होत आहे.

विरुष्काने त्यांच्या मुलाच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे हे अद्याप जाहीर केलेले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार, ‘अकाय’ या शब्दाचा अर्थ पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या रात्रीचा झगमगता प्रकाश किंवा पूर्ण चंद्र असा होता.

अनुष्कानं आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं असून ‘अकाय’ असं नाव आहे. अनुष्कानं मुद्दाम हिंदी देवनागरीत हे नाव आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. विराट आणि अनुष्काला विमिका नावाची एक मुलगीही आहे. त्यामुळं आता विमिकाच्या छोट्या भावाचं अर्थात अकायचं आगमन झाल्यानं आमचे कुटुंबिय खूप खूप आनंदात आहेत असंही अनुष्कानं म्हटलं आहे.

विराटने ‘अकाय’च्या जन्माची पोस्ट शेअर करताना हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. त्याने असे लिहिले की, ‘अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या आमच्या अंतःकरणाने सर्वांना कळविण्यात आनंद होतोय की १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचे बाळ ‘अकाय’चे आणि वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सर्वात सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. तसेच आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे की, यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. प्रेम आणि कृतज्ञता- विराट आणि अनुष्का’.विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीत लग्नगाठ बांधली. या दोघांना ११ जानेवारी २०२१ रोजी ‘वामिका’ हे कन्यारत्न प्राप्त झाले.

हे ही वाचा:

EXCLUSIVE :हेलिकॅाप्टरने फिरण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की…

कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी केली सरकारवर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss