Friday, April 19, 2024

Latest Posts

EXCLUSIVE :मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो- एकनाथ शिंदे

महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा साठवा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा साठवा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाईम महाराष्ट्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्या तर्फे सातारा जिह्ल्यातील महाबळेश्वरजवळ असलेल्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली. या पॅराग्लायडिंग स्पर्धेसाठी देशविदेशातील सुमारे १५० पायलट पाचगणीमधील स्पर्धेत सहभागी झाले होते. पॅराग्लायडिंग हा एक साहसी क्रीडा प्रकार आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पॅराग्लायडर्सने आकाशात उंच भरारी घेत स्पर्धेचा आनंद घेतला.

पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पाचगणीमधील बिली मोरया शाळेच्या पटांगणावर पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या पॅराग्लायडर्सना बक्षीस देण्यात आले. तसेच स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना चिठ्या देऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी संदर्भातल्या समस्या लिहून घेण्यात आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.टाईम महाराष्ट्राचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना वसंतदादा पाटलांनंतर सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तेव्हा करतो बघतो सांगतो असे बोलले जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ”सगळे विभाग असले तरी सगळ्या विभागाचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतकऱ्यांसाठी योजना आणतो. मोठ्या प्रमाणावर आमचं सरकार काम करत आहे. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझी नाळ मातीशी जुळली आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वेदना कळतात. त्यामुळे करतो बघतो हे माझ्या शब्दकोशात नाही.माझ्या डोक्यात कधीच मुख्यमंत्री पद गेलेले नाही. मी स्वतःला कॉमन मॅन समजतो. त्यामुळे मला लोकं भेटतात. लोकांना भेटणं हा माझा आवडता विषय आहे. घरात बसून, मंत्रालयात बसून, फेसबुक लाईव्ह करून काम करत नाही. मी लोकांना भेटून काम करतो. बांधावर जातो आणि सगळ्यांना भेटतो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पाचगणीमध्ये पार पडलेल्या पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप स्पर्धेला भारतासह विदेशी स्पर्धकांनी यात मोठा सहभाग घेतला होता. पहिल्यांदाच या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षीस देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्यादिवशी ‘प्रोजेक्ट देव डी बँड’ च्या सुरेल मैफिलीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

हे ही वाचा:

EXCLUSIVE :हेलिकॅाप्टरने फिरण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की…

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss