Tuesday, April 16, 2024

Latest Posts

‘या’ दिवशी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प होणार सादर

१ फेब्रुवारी रोजी केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर आता राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

अर्थसंकल्पिय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२४ ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे हे मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

 ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा  धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Manoj Jarange Patil यांनी सरकारला दिला इशारा, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss