Tuesday, April 16, 2024

Latest Posts

EXCLUSIVE :हेलिकॅाप्टरने फिरण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की…

१८ फेब्रुवारीला महाबळेश्वर जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ (Paragliding Pre World Cup 2024) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

१८ फेब्रुवारीला महाबळेश्वर जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ (Paragliding Pre World Cup 2024) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. बिली मोरया शाळेच्या पटांगणावर हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टाईम महाराष्ट्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्या तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पाचगणी पॅराग्लायडिंगची पंढरी म्हणून ओळखली जाते. याचं पॅराग्लायडिंगच्या पंढरीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आणि स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. बिली मोरया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतली. हेलिकॅाप्टर घेऊन तुम्ही शेती करायला जाता असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरी मी माझ्या गावात पिकवतो. हेलिकॅाप्टरने गावात गेल्यानंतर माझे ६ तास वाचतात. जर मी हेलिकॅाप्टरने गेलो तर १ तासांत मी गावी पोहचतो. त्यामुळे माझे ५ तास वाचतात. त्या ५ तासांत मी शेतकऱ्यांना भेटतो, गावकऱ्यांना भेटतो, तिथली शिष्ट मंडळी येतात त्यांचे मी तिकडे प्रश्न सोडवतो. तिथे कलेक्टर, एसपी, काही अधिकारी यांना सुद्धा मी तिकडे बोलावतो. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लवकर सगळे प्रश्न मार्गी लागतात. हेलिकॅाप्टरने शेतकऱ्याने फिरू नये असा कायदा आहे का? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या भिवंडीमध्ये एक दुधवाला आहे त्याने हेलिकॅाप्टर घेतला आहे. मी तर सरकारी हेलिकॅाप्टरमध्ये फिरतो. आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॅाप्टरमध्ये फिरू नये का फिरावं बिनधास्त.वेळेची बचत करण्यासाठी मी हेलिकॅाप्टरने फिरतो. मुख्यमंत्री असल्यामुळे माझा एक एक मिनिटं महत्वाचा आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे पाय शेतीकडे वळतात. मी स्ट्रॉबेरी, आंबे, काजू ,फळबागा, पालेभाज्या माझ्या गावी लावल्या आहेत. गावाला मी सफरचंदाची बाग सुद्धा केली आहे. माझी नाळ शेती आणि मातीशी जुळली आहे. मी जमिनीवरचा माणूस आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात कुठली हवा नाहीये, माझे पाय जमिनीवरच आहेत. त्यामुळे कोणाला टीका करायची असले तर करू द्या. हेलिकॅाप्टरमध्ये जाऊन फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली केव्ही चांगलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले. स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, जीवन गलांडे, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

हे ही वाचा: 

कांदा निर्यातीवरून जयंत पाटलांनी केली सरकारवर जोरदार टीका

Exclusive :CM Eknath Shinde यांना स्ट्रॅाबेरीचं काय आवडतं चव की रंग? म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss