Monday, May 20, 2024

Latest Posts

अंकुश आणि दीपा चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार,पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

 दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा या दोन्ही चित्रपटांनी यंदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

 दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा या दोन्ही चित्रपटांनी यंदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.या दोन्ही चित्रपटांतील कलाकारांना यंदाच्या झी चित्र गौरव पुरस्कार  सोहळ्यात गौरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात बाईपण भारी देवा या चित्रपटातील सहाही अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळालाय. पण या सोहळ्याची एक गोड आठवण अभिनेत्री दीपा परब चौधरीने शेअर केलीये. या सोहळ्यात अंकुश चौधरीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.

‘बाईपण भारी देवा’  चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने, दीपा परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर,आणि रोहिणी हट्टंगडी  या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. तर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सहाही अभिनेत्रींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

दुग्धशर्करा योग..! 2023 हे वर्ष खूप सुंदर गेलंच पण 2024 ची सुरुवात देखील तितकीच सुंदर आणि आनंद देणारी आहे. यावर्षी झी चित्र गौरव २०२४ या सोहळ्यात आम्हा दोघांनाही ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटांसाठी अवॉर्ड्स मिळाले आणि हे शक्य होण्यासाठी त्यामागील एकमेव दुवा म्हणजे यशस्वीपणे दोन्ही चित्रपटांची धुरा सांभाळणारा कॅप्टन ऑफ द शिप… दिग्दर्शक केदार शिंदे. शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड असो वा माझ्या इंडस्ट्रीतील कम बॅक साठी बाईपण सारखा चित्रपट तुझी दूरदृष्टी आणि आम्हा दोघांवरील विश्वास यामुळेच आज घरी परततांना 2-2 ट्रॉफिज हातात असतात. हे दोन्ही चित्रपट आणि ह्या असंख्य आठवणी नेहमीच आमच्या मनात घर करून राहतील.

बॉक्स ऑफिससह यंदाचा ‘झी चित्र गौरव 2024’देखील महिलांनी गाजवला आहे. उषाताई मंगेशकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यावर्षीच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे ‘प्रिया बापट’. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ आणि दुसरी म्हणजे ‘सारा अली खान’ यांनी सोहळ्यात उपस्थिती लावली . साराने ‘ऐका दाजीबा’ म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.  यंदाचा हा झी चित्र गौरव पुरस्कार खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला आहे.

हे ही वाचा:

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल

गुजरातच्या पलीकडे मोदींना देश दिसत नाही; संजय राऊतांची मोदींवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss