Sunday, May 5, 2024

Latest Posts

Christmas 2023: घरच्या घरी करा ख्रिसमसचे Celebration

आता ख्रिसमसला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. देशभरात ख्रिसमसची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकीकडे ख्रिसमस ट्री आणि लाईट्सने घरांना सजवलं जातं. तर दुसरीकडे पार्टीचे नियोजनही करण्यात येतं. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्या घरी पार्टीचा प्लॅन जर कोणाला करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात किंवा मग कुठल्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्या करता येतील यासाठी आजचा हा लेख आहे. आज आपण ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी थीम पासून गेम्सपर्यंत काय काय गोष्टी लागतात, त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1.सर्वात आधी ख्रिसमस पार्टी प्लॅन करण्यासाठी गेस्ट लिस्ट तयार करणे आवश्यक आहे. कोण कोण पाहुणे येणार आहेत याची जर यादी केली तर तुम्हाला पार्टीमध्ये नक्की किती लोक येणार आहेत याचा अंदाज घेता येईल.

2.पार्टीसाठी सर्वांना निमंत्रण पाठवल्यानंतर त्या सर्वांकडून ते येणार आहेत की नाहीत, या गोष्टीची खात्री करून घ्या. जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल की किती जण पार्टीला येणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही पुढील नियोजन करू शकता.

3. तुम्ही ख्रिसमस पार्टीसाठी कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांनुसार थीम ठेवू शकता. पार्टीमध्ये येणाऱ्या व्यक्तींची दोन गटांमध्ये विभागणी करून आणि मग काहींना लाल रंग तर काहींना त्यांच्या सोयीनुसार आवडेल त्या रंगाचे कपडे घालायला सांगा म्हणजे थीमनुसार तुम्ही ख्रिसमसच्या संबंधित दुसरे रंग निवडून एक नवीन लुक देऊ शकता.

4. पार्टीमध्ये सर्वांचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जेवण. त्यासाठी पार्टीमधील तुमचं जेवण टेस्टी असणं खूप गरजेचं आहे. ख्रिसमस पार्टी आहे म्हणून मेनू मध्ये चॉकलेट किंवा केक हे पदार्थ तर असतीलच पण त्याशिवाय काहीतरी वेगळं किंवा युनिक असं तुम्ही ठेवू शकता. पार्टीमध्ये स्टार्टर काय ठेवायचं याची आधीपासूनच यादी करून घ्या आणि एक्स्ट्रा काही लागेल त्या गोष्टी फ्रीजमध्ये तुम्ही आणून ठेवा.

5. ख्रिसमस पार्टीमध्ये कपडे, केक, चॉकलेट, जेवण यासोबतच मेन मुद्दा ठरतो तो म्हणजे खेळण्याचा. सर्वजण एकत्र आले आणि जर गेम खेळले नाही तर मग काही मज्जाच येणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गेम्सचा विचार करून तुम्ही थीमनुसार एखादी गेम ठरवून त्याचा आनंद घेऊ शकता. सीक्रेट सांता किंवा गाण्यांची अंताक्षरी नाहीतर कोणतेही कपल गेम तुम्ही ठेवू शकता.

तर मग अशा प्रकारे प्लॅनिंग करून आणि सर्व गोष्टी ठरवून तुम्ही ख्रिसमस पार्टी घरच्या घरी सुद्धा करू शकता.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss