Saturday, March 2, 2024

Latest Posts

IPL 2024, Delhi Capitals ने अज्ञात खेळाडूवर खर्च केले 7.20 कोटी, जाणून घ्या कोण आहे Kumar Kushagra

इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (Indian Premier League 2024) लिलावात, अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त किमती मिळाल्या आहेत.

Kumar Kushagra Delhi Capitals IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (Indian Premier League 2024) लिलावात, अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त किमती मिळाल्या आहेत. या लिलावात परदेशी खेळाडूंसह देशी खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 19 वर्षीय अज्ञात खेळाडूवर 7.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीने कुमार कुशाग्रला ( Kumar Kushagra ) मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन विकत घेतले आहे. कुशाग्राने अंडर-19 टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो झारखंडकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो.

कुमार कुशाग्रची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सामन्यात प्रवेश केला. गुजरात आणि चेन्नई यांच्यात थोडक्यात लढत झाली. चेन्नईने 60 लाखांची शेवटची बोली लावली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बोली लावण्यास सुरुवात केली. दिल्ली आणि गुजरात यांच्यातील लढत शेवटपर्यंत सुरू राहिली. गुजरातने 7 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. पण शेवटी दिल्ली जिंकली. दिल्लीने त्याला 7.20 कोटी रुपयांना खरेदी केले.

कुशाग्रने दिल्लीविरुद्ध खेळताना प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये झारखंडसाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. लिस्ट ए मधील पहिला सामना फेब्रुवारी 2021 मध्ये मध्य प्रदेश विरुद्ध खेळला गेला. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याने पहिला T0 सामना खेळला. कुशाग्राने अनेक प्रसंगी भारतीय अंडर-19 संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 23 लिस्ट ए सामन्यात 700 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 अर्धशतके केली आहेत. 13 प्रथम श्रेणी सामन्यात 868 धावा केल्या. त्याने 11 टी-20 सामन्यात 140 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss