Friday, April 19, 2024

Latest Posts

आई अंबाबाईच्या मंदिरात कित्तेक वर्ष घडतो एक दैवी चमत्कार,जाणुन घ्या पौराणिक महत्त्व

कोल्हापूरमधील प्रसिद्ध असलेलं महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे.अनेक ठिकाणांहून भाविक महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

कोल्हापूरमधील प्रसिद्ध असलेलं महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे.अनेक ठिकाणांहून भाविक महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.दरम्यान महालक्ष्मी मंदिरातील देवीला अंबाबाईचं मंदिर देखील म्हंटलं जात.तसचं करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात कित्तेक वर्ष एक दैवी चमत्कार घडतो आहे. ज्याला खगोल शास्त्रीय अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अंबाबाईच्या मंदिरात ऑक्टोबर आणि फेब्रूवारी या दोन महिन्यात एक घटना घडते. या घटनेमागे एक पौराणिक कथाही आहे.

किरणोत्सव करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या वर्षभरातल्या सर्व उत्सवात अनोखा असा उत्सव म्हणजे किरणोत्सव . सूर्याची मावळती किरणं साक्षात जगदंबेच्या विग्रहाला सोनसळी अभिषेक घालून नटवतात.ती किरण देवीच्या अंगावर अगदी पिवळसर रंगात उटुन दिसतात.

दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्याची उत्सुकता अनेकांना असते. प्रत्येकवर्षी उत्तरायणात ३१ जानेवारी १,२ फेब्रुवारी तर दक्षिणायनात ९,१०,११ नोव्हेंबर हे किरणोत्सवाचे पारंपरिक दिवस आहेत. पण या उत्सवाच्या तारखांचा अभ्यास करण्यासाठी आधी आणि नंतर एक दोन दिवस निरिक्षण ठेवण्याचा प्रघात २०१८ पासून पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ठेवला आहे त्याचे चांगले परिणाम ही दिसून येत आहेत.

किरणोत्सव हा एकमेव असा उत्सव आहे ज्यात मानवाची काही भूमिका असत नाही. किंबहुना मानवी हस्तक्षेप या सोहळ्याला खपतच नाही हा सोहळा फक्त आईचा आणि जग भ्रमण करुन थकलेल्या तिच्या तेजस्वी पुत्राचा म्हणजे सूर्याचा. त्यामुळे किरणोत्सव पहायला मिळणं हे सर्वस्वी जगदंबेवर अवलंबून असते.

इतर उत्सवांना आहे तशी पौराणिक कथा किरणोत्सवाला नसली. तरी हरी गोपाळ अंगापूरकर लिखित लक्ष्मीविजय ग्रंथांत दिलेल्या कथेप्रमाणे कोल्हासूराच्या वधानंतर त्याच्या शरिरातून बाहेर पडलेल्या पंचप्राणांनी प्रथम देवीचे चरण, नंतर पोट अन् छाती, मग चेहरा उजळला अन् पुन्हा आलेल्या मार्गाने तो अग्नी जगदंबा चरणांशी विलीन झाले. त्याचीच प्रचिती लोकांना आजही येते.

या उल्लेखावरूनच ‌पाच दिवसांचा किरणोत्सव होता हे गृहीतक मांडलं आणि १९४६ च्या कोल्हापूर महानगर पालिकेच्या अहवालाने ते सिद्धही झाले. किरणोत्सव होणारं करवीरनिवासिनीच एकमेव मंदिर आहे असं नाही.अनेक मंदिरात सूर्याची उगवती किंवा मावळती किरणं देव मूर्तीला स्पर्श करतात पण करवीर निवासिनीच्या मंदिराच आगळं वैशिष्ट्य हे की महाद्वारापासून १०० ते १५० मीटरचं अंतर कापून   ही किरणं मंदिरात देवी पर्यंत पोहोचतात.आजही या दिवशी सूर्यास्तापूर्वी अर्धा ते पाऊण तास सर्व विद्युत दिवे घालवले जातात दर्शन रांग थांबवली जाते. महाद्वार रोड,गरूड मंडप, मध्यभागी, गणपतीमंदिरामागील जीना, गणपती मंदिर चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, खजिना चौक, गर्भगृह, गर्भकूटी असा प्रवास करून सुर्याची किरणे देवी अंबाबाईच्या संपूर्ण शरीरावर विसावतात.

मंदिराचे बांधकाम करताना खगोलशास्त्राचा असा वापर केला आहे की, ज्यामुळे किरणोत्सवाच्या काळात संपूर्ण मूर्ती सुर्यकिरणांनी व्यापली जाते. देवीच्या मूर्तीला स्पर्श करतात. नेत्र आणि मन धन्य करतात.देवीची मूर्ती सप्तशतीत म्हणल्याप्रमाणे तप्तकांचन वर्णा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची भासते. घाटी दरवाजा वरच्या मोठ्या घंटेचा निनाद होतो वैशिष्ट्य म्हणजे आजच्या दिवशी करवीर निवासिनीची सहावी कापूरारती होते. किरणोत्सवाचा सोहळा संपन्न होतो.

आई चोपडाई देवीचा किरणोत्सव

जोतिबा मंदिरावर असलेल्या चोपडाई देवीच्या मंदिरातही किरणोत्सव घडतो. त्याचे खास वैशिष्ट्य असे आहे की, वर्षाच्या सुरूवातीचा अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव संपल्यानंतर २१ दिवसांनी चोपडाई देवीचा किरणोत्सव पार पडतो. तर दक्षिणायण किरणोत्सवाच्या वेळी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात अंबामातेच्या किरणोत्सवाच्या २१ दिवस आधी चोपडाईदेवीच्या मंदिरात किरणोत्सव होतो.

 

हे ही वाचा:

कोट्यावधीची संपत्ती मागे टाकत पूनम पांडेचं निधन,जाणुन घ्या संपत्ती

सोनाली कुलकर्णीचा मलाइकोट्टाई वालिबान’या मल्याळम चित्रपटातील मधील लूक आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss