Friday, May 10, 2024

Latest Posts

कोट्यावधीची संपत्ती मागे टाकत पूनम पांडेचं निधन,जाणुन घ्या संपत्ती

पूनमने जरी खुप कमी वयात या जगाचा निरोप घेतला असला,तरी तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.

बॉलीवूड अभिनेत्री,मॉडेलचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे.आज म्हणजे २ फेब्रुवारीला तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे.वयाच्या १८व्या वर्षी तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली,पूनमने २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सोशल मीडिया अकाऊंट्सवरील सेमीन्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत असायची.

पूनमने जरी खुप कमी वयात या जगाचा निरोप घेतला असला,तरी तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पूनमची एकूण संपत्ती जवळपास 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा आलिशान अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे लग्झरी कारसुद्धा आहेत. तिच्याकडे असलेल्या BMW 5 सीरिजमधील सेडान कारची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे.

अभिनय आणि मॉडेलिंगशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये मानधन स्वीकारत होती. पूनमचं खासगी आयुष्य तसं बर नव्हतं.ती तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत येत ङोती.

1 सप्टेंबर 2020 रोजी तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सॅमवर तिने धमकी आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी सॅमला गोव्यातून अटक झाली होती. पूनमला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपड्यांमध्ये पाहिलं गेलंय. ट्रोलिंगला न जुमानता पूनम अनेकदा बोल्ड अंदाजात दिसायची. कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये ती म्हणाली होती, “माझ्या पहिल्या नशा या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले होते. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”पूनमने तिच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामाना केला आहे.

हे ही वाचा:

सोनाली कुलकर्णीचा मलाइकोट्टाई वालिबान’या मल्याळम चित्रपटातील मधील लूक आला समोर

अर्थसंकल्पात सर्व्हायकल कॅन्सरसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss