Saturday, May 11, 2024

Latest Posts

सोनाली कुलकर्णीचा मलाइकोट्टाई वालिबान’या मल्याळम चित्रपटातील मधील लूक आला समोर

महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता दाक्षिणात्य चित्रपटात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता दाक्षिणात्य चित्रपटात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.सोनालीचे नृत्यावरील प्रेम आपल्या मराठी प्रेक्षकांनी सगळ्यानीचं अनुभवलं आहे.दरम्यान आता  सोनाली दाक्षिणात्या चित्रपटात आपल्या नृत्याच्या अदानी घायळ करणार आहे.

या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ” हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.”

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,तिचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.ति तीचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना देत असते,चाहते देखील सोनालीच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट्स करत असतात.मात्र आता सोनालीचे हे मल्याळम चित्रपटातील पदार्पणामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आता आणखी भर पडणार आहे.

ही वाचा:

अर्थसंकल्पात सर्व्हायकल कॅन्सरसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती

तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठे आहे ? – उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss