Saturday, May 18, 2024

Latest Posts

श्रावण महिन्याला होतेय सुरवात, या ठिकाणी नक्की भेट द्या

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा म्हणजेच २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येत आहे. आणि त्यामुळे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan 2023) सुमारे दोन महिन्यांचा असेल.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा म्हणजेच २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येत आहे. आणि त्यामुळे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan 2023) सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होत असून १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. पण, महाराष्ट्रात जरी श्रावण १८ जुलै पासून सुरु होत असला तरी उत्तर भारतात ४ जुलै पासून श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिना हा भक्तीचा आणि उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. या श्रावणात तुम्हाला देखील पवित्र अशा तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला काही प्रसिद्ध अशा स्थळांची नावं सांगणार आहोत. तसेच श्रावण महिन्यामध्ये उपास देखील केले जातात. जसे की , श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार , श्रावणी शनिवार यासारखे उपास हे केले जातात. त्याचबरोबर देवाचा पूजा पठाण जास्त प्रमाण केले जात. तसेच श्रावण महिना हा शुद्ध शाकाहारी महिना असल्याने मांसाहाराकडे कोणी वळत देखील नाही. श्रावण महिना जसजसा जवळ येत चालला आहे तसतसा भाविकांचा उत्साह वाढत चालला आहे. ४ जुलैपासून सुरु होणारा हा महिना ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थात अधिक मास असल्या कारणाने जवळपास दोन महिने श्रावण असणार आहे. उत्तर भारतात देखील श्रावण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी भगवान शंकराला लोक विशेष मानतात. या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करून आशीर्वाद मिळवून साजरा केला जातो.

श्रावणात भेट देण्यासाठी ५ प्रसिद्ध धार्मिक स्थळांची यादी

१. वाराणसी, उत्तर प्रदेश

याठिकाणी अनेक भाविक लोक ही दर्शनासाठी नेहमीच येत असतात. परंतु श्रावण महिन्यामध्ये वाराणसी आणि उत्तरप्रदेश या ठिकाणी भाविकांची पूजा पाठ जास्त प्रमाणात होते. तर गंगा नदीला आपल्याकडे विशेष महत्व असल्या कारणाने येथे भाविक गंगा नदीचे दर्शन घेण्यासाठी देखील जमतात. गंगा नदीच्या काठावर वसलेले, बनारस किंवा वाराणसी या प्राचीन शहराला कोणत्याही वेगळ्या अशा ओळखीची गरज नाही. इथल्या घाटापासून ते मंदिरापर्यंत, शहराला इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान आहे. श्रावण महिन्यात इथल्या काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि आरती पाहण्यासाठी देशांतील विविध कानाकोपऱ्यांतून भाविक या शहराला भेट देतात.

२. हरिद्वार/ऋषिकेश, उत्तराखंड

४ जुलैपासून सुरु होणारा हा महिना ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थात अधिक मास असल्या कारणाने जवळपास दोन महिने श्रावण असणार आहे. श्रावण महिन्यात ‘कंवर’ म्हणून ओळखले जाणारे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यांतून पायी प्रवास करून मंदिरांना भेट देतात आणि गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. श्रावणाच्या उत्सवात तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही देखील उत्तराखंड राज्यात असलेल्या या दोन ठिकाणांना भेट देऊ शकता.

३. देवघर, झारखंड

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा म्हणजेच २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येत आहे .श्रावण महिना हा भक्तीचा आणि उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. या श्रावणात तुम्हाला देखील पवित्र अशा तीर्थक्षेत्रांना भेट देतात. झारखंड राज्यातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे देवघर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी बाबा वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी यात्रेकरू फार दूरवरून येतात. या ठिकाणचं हे यात्रेकरूंचं प्रमुख केंद्र आहे.

४. उज्जैन, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. या ठिकाणाला भगवान शंकराचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते.

५. तारकेश्वर, पश्चिम बंगाल

तारकेश्वर हे पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एक छोटेसे शहर आहे. बंगाली भाषेत याला ‘बाबर धाम’ म्हटले जाते. ज्याचा अर्थ ‘शंकराचे शहर’ आहे. तारकेश्वर कोलकात्यापासून 58 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी ट्रेन किंवा बसने सहज पोहोचता येते.

हे ही वाचा:

गुंतवणूक न करता करा स्वतःचा व्यवसाय सुरु

मिश्र धान्यांची खीर चाखून बघा खूप लागते टेस्टी :

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss