Sunday, April 28, 2024

Latest Posts

मथरा-वृंदावनातील आगळी-वेगळी होळी,जाणुन घ्या

यंदा होळी २४ आणि २५ मार्चला साजरी होणार आहे. २४ मार्चला होलिका दहन केल्यानंतर २५ मार्चला रंगांची होळी खेळली जाईल.

मार्च महिन्याला सुरुवात झाली की होळीचे वेद लागतात.दरम्यान भारतात वेगवेगळ्या प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.आपण आपल्या राज्यात प्रत्येकाच्यानुसार होळी साजरी करतो.तरुणाईंमध्ये होळी खेळण्याचा जोश जरा काही वेगळाच असतो.

दिवाळी, दसरा, गुढीपाडवा आणि होळी इत्यादी अनेक सणांची आपल्याकडे मोठी धामधूम असते. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. यंदा होळी २४ आणि २५ मार्चला साजरी होणार आहे. २४ मार्चला होलिका दहन केल्यानंतर २५ मार्चला रंगांची होळी खेळली जाईल.

यंदा होळीच्या दरम्यान, विकेंड देखील आला आहे. त्यामुळे, ३ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही होळी मस्त एंजॉय करू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये होळी विविध प्रकारे साजरी केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये होळीच्या काही वेगळ्या परंपरा देखील आहेत.त्यामुळे, या विकेंडला तुम्ही होळीच्या निमित्ताने फिरायला जाण्याचा प्लॅन ही करू शकता. उत्तर प्रदेशातील वृंदावन-मथुरेतील होळीचा उत्सव हा वेगळा आहे. येथील होळी आणि रंगोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक गर्दी करतात. होळीच्या निमित्ताने तुम्ही देखील मित्र-मैत्रिणींसह किंवा कुटुंबासह मथुरा-वृंदावनला फिरायला जाऊ शकता.

उत्तर प्रदेशातील मथुरा-वृंदावनची होळी जगात प्रसिद्ध आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. येथील होळीची अनोखी परंपरा म्हणजे लाठमार होळी होय. ही लाठमार होळीची अनोखी परंपरा मथुरा-वृंदावनला लाभली आहे. त्यामुळे, येथील होळी पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी अनेक पर्यटक भगवान श्रीकृष्णाच्या शहरात अर्थात वृंदावनला येतात.

येथील द्वारकाधीश मंदिर आणि वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. देश-विदेशातील लोक ही होळी खेळण्यासाठी ३-४ दिवस आधीच हजेरी लावतात. या लाठमार होळीच्या परंपरेत स्त्रिया पुरूषांवर लाठ्या किंवा काठ्यांनी मारतात आणि त्यांना रंग देखील लावतात.दरम्यान यंदा होळी ही आठवड्याच्या शेवटच्या दिवसात असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन नक्की करु शकता.

   हे ही वाचा:

महाराष्ट्रामध्ये ५ टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या तारखा

सोनु सुदचे दिग्दर्शनात पदार्पण,’फतेह’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss