Monday, May 20, 2024

Latest Posts

AKSHAYA TRITIYA Special साजूक तुपाचा शिरा

यंदा १० मे रोजी जगभरात अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मनाला जातो. या दिवशी अनेक शुभ काम केली जातात. बहुतेक लोक सोने खरेदी, मालमत्ता, नवीन घर घेतात. अक्षय तृतीयच्या दिवशी अनेकजण उपवास करतात. या दिवशी उपवासाला भरपूर महत्व आहे. या दिवशी पांढऱ्या कमळ किंवा पांढऱ्या फुलांनी पूजा करताना अक्षद, हळद, कुंकू अर्पण करतात. पूजेनंतर प्रसाद तयार केला जातो. त्यामुळे तुम्ही प्रसादासाठी तुपाचा शिरा बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात याची रेसिपी.

साहित्य –

रवा साखर तूप दूध ड्रायफ्रूट केसर वेलची पूड पाणी कृती – सर्वाप्रथम एक कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये तूप टाका. तूप गरम झाल्यांनतर त्यामध्ये राव टाका. हलका सोनेरी रंगयेईपर्यंत नीट भाजून घ्या. जर रवा भाजताना तूप कमी पडत असेल तर त्यामध्ये तूप टाका. रवा आणि तूप चांगले मिक्स केल्यांनतर त्यामध्ये ड्रायफ्रुट टाका. ड्रायफ्रुट एकत्र केल्यांनतर त्यामध्ये एक कप पाणी घाला. आणि सतत ढवळत राहा. कढईच्या तळाशी रवा चिकटणार नाही. रवा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घाला. साखर चांगली विरघळुन घ्या. त्यामध्ये नाननंतर वेलची पूड टाका. एका वाटीमध्ये २ चमचे दूध घ्या. त्यामध्ये केसर टाका. नांतर तयार केलेले केसर दूध त्या रव्यामध्ये टाका. त्यांनतर कढईवर झाकण ठेवा. रवा छान वाफेवर शिजवून घ्या. अश्या प्रकारे तयार आहे साजूक तुपातला रवा.  

हे ही वाचा : 

चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss