Thursday, April 25, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023: वट पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हे’ घ्या खास उखाणे

वट पौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्री साठी अगदी खास सण असतो. या दिवशी म्हणजेच वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत पाळते. या दिवशी विवाहित स्त्रिया ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात.

वट पौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्री साठी अगदी खास सण असतो. या दिवशी म्हणजेच वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत पाळते. या दिवशी विवाहित स्त्रिया ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीला चांगले व निरोगी आयुष्य दीर्घकाळ लाभावे यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत श्रद्धेने पाळतात. जन्मोजन्मी आपल्याला हाच जोडीदार मिळूदे अशी प्रार्थना स्त्रिया या दिवशी करतात. स्त्रिया आपल्या पतीला शिवरूपी मानून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया ह्या अगदी उत्साहात तयार होऊन साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यास बाहेर पडतात. पारंपरिक पद्धतीने सजून त्या आपले वैवाहिक आयुष्य आनंदात जावे यासाठी प्रार्थना करतात. यादिवशी बायका साडी नेसण्यास प्राधान्य देतात. दागदागिने घालून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा वट पौर्णिमा ही ३ जून २०२३ रोजी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यादिवशी पत्नी आपल्या पती साठी उखाणे घेते. पण काही वेळेस हे उखाणे आपल्याला लगेच सुचत नाहीत. त्यामुळे पतीसाठी पत्नीकडे उखाणा हा तयार असलाच पाहिजे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही दर्जेदार उखाणे घेऊन आलो आहोत.

दर्जेदार उखाण्याची यादी पुढीलप्रमाणे:

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
_ रावांची साथ जन्मोजन्मी असावी

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास…
__रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात…
__रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ

वटपौर्णिमेचे व्रत,भक्तीने करते…
__रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
_रावांसोबत झाले आताच माझे लग्न

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
_रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य…
__रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून…
__रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

हे ही वाचा:

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Vat Pournima 2023: ‘या’ कारणासाठी साजरी करतात वटपौर्णिमा

खुपते तिथे गुप्ते मधून मुख्यमंत्र्यांनी कोणाला केला ‘तो’ स्पेशिअल कॉल?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss