तुम्ही APPLE JILEBI कधी खाल्ली आहे का? ‘ही’ खास रेसिपी तुमच्यासाठी

सफरचंद हे सेवनास अतिशय गोड आणि चविष्ट असतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच हे फळ खायला प्रचंड आवडतं. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य असले की आपण गोड पदार्थ हे हमखास बनवतो.

तुम्ही APPLE JILEBI कधी खाल्ली आहे का? ‘ही’ खास रेसिपी तुमच्यासाठी

सफरचंद हे सेवनास अतिशय गोड आणि चविष्ट असतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच हे फळ खायला प्रचंड आवडतं. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य असले की आपण गोड पदार्थ हे हमखास बनवतो. स्त्रिया घरामध्येच शिरा, खीर, बासुंदी असे गोड पदार्थ करतात. अलीकडे विकतचे गोड पदार्थ खाण्यास अनेकांचा कल वाढला आहे. पेढे, बर्फी, जिलबी असे पदार्थ घरच्या घरी आठवड्यातून वारंवार येतच असतात. मात्र, बाहेर मिळणारे पदार्थ घरीदेखील तितकेच चविष्ट आणि सहजरित्या करता येऊ शकतात. यामध्येच जिलबी ही अनेकांच्या आवडीची असून ती घरी करणं अत्यंत सोपं आहे. म्हणूनच घरच्या घरी अ‍ॅपल जिलबी कशी बनवायची याची खास रेसिपी आज आम्ही घेऊन आलो आहोत.

जिलेबी हा अनेकांचा आवडीचा गोड पदार्थ आहे. तसेच सफरचंद हे फळ देखील सर्वांनाच आवडतं. सफरचंद हे आपल्यासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर असतं. डॉक्टर सुद्धा आजारांपासून दूर राहण्यासाठी सफरचंद सेवनाचे सल्ल्ले देतात. म्हणूनच चला जाणून घेऊयात आपल्याला निरोगी ठेवणाऱ्या फळा पासून बनवलेली जिलेबी कशी बनवावी.

अँपल जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

४ मोठे पिकलेले सफरचंद (भुसभुशीत नको)
१ वाटी मैदा
चिमूटभर सोडा
१ वाटी साखर
२ वाट्या पाणी
तूप
खायचा रंग

अँपल जिलेबी बनवण्याची कृती –

सर्वप्रथम सफरचंद धुऊन, पुसून घ्यावा. गुलाबजाम बनवण्यासाठी जसा पाक तयार केला जातो त्याप्रमाणे साखरेचा पाक करून घ्यावा. त्यात वेलची पूड मिसळून ठेवावी. मैद्यात थोडं दूध, पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडं पातळ मिश्रण तयार करून घावे. तयार केलेल्या मिश्रणात थोडासा सोडाही घालावा. जर खायचा रंग घालायचा असेल तर तोही आत्ताच या पिठात घालून घ्यावा. नंतर सफरचंदाच्या आडव्या गोल चकत्या कराव्या. सफरचंदाचा मधला बी असलेला भाग हलक्या हाताने पोखरून घ्यावा. आता तूप तापवत ठेवावे. सफरचंदाच्या चकत्या मैद्याच्या पिठात बुडवून तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत तळाव्यात. त्यांचा एक घाणा झाल्यावर तो पाकात बुडवून ठेवावा. मग दुसरा घाणा तळून झाल्यावर पहिला पाकातून बाहेर काढावा.

अशा प्रकारे मस्त कुरकुरीत झटपट चविष्ट आणि गोड अँपल जिलेबी तयार आहे.

Exit mobile version