१ ते ५ वयोगटातल्या मुलांना रंगांचे खूप आकर्षण असते. या वयात मुलांना रंगीबिरंगी पदार्थ आकर्षित करत असतात. त्यामुळे मुलांना कुरकुरीत पदार्थ खायला आवडतात. शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हा महत्वाचा काळ आहे. त्यामुळे त्यांना पोषक आहार देणं गरजेचं आहे. १ ते ५ वयोगटातल्या मुलांना नुकतीच रंगांची ओळख होत असते. त्यामुळे मुलांना रंगीबेरंगी खायला किंवा बगायला आवडत असत. म्हणूनच आम्ही तुम्हाला एका रेसिपी बदल सांगणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नाश्तासाठी पण बनवू शकता.
साहित्य:-
२ कप मैदा, ३-४ पाकळ्या लसूण, १ हिरवी मिरची, १ कप पालक, १ बीट, १टीस्पून ओवा, २चमचे तूप, चवीनुसार मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती:-
सर्वप्रथम पालक बीटरूट पुरी बनवण्यासाठी पालकला स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एक टोपात पालक, लसूण,हिरवी मिरची घालून उकळायला ठेवा. थोड्यावेळानी थंड झाल्यावरती त्यांना बारीक कापून घ्या. बीटरूट स्वच्छ धुऊन घ्या. नंतर चांगले सोलून घ्या. बीटरूट किसा .किंवा बीटरूटचे तुकडे मिक्सरला लावून प्युरी बनवून घ्या. त्यानंतर मैद्यामध्ये तूप, किंवा मीठ टाका. आता या पिटाचे २ भाग करून घ्या. एका भागामध्ये पालक प्युरी आणि दुसऱ्या भागामध्ये बीटरूट प्युरी घालून मऊ पीठ मळून घ्या. आवश्यक असल्यास पाण्याचा वापर करावा अन्यथा करू नये. आता त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. तुम्ही या पुऱ्या वेगवेगळ्या आकारत कापू शकता. किंवा गोलाकर करू शकता. नंतर पुऱ्या गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत गरमागरम पालक बीटरूट पुरी.
हे ही वाचा:
अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार, दानवेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले..
वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावरील टोलमध्ये १ एप्रिलपासून ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ
Follow Us